महायुती सुसाट; महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष नेतेपद’ मिळणार? माळवणकर रूल काय सांगतो…

महायुती सुसाट; महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष नेतेपद’ मिळणार? माळवणकर रूल काय सांगतो…

Mavlankar Rule and Opposition Leader position : राज्यात आज 288 मतदारसंघासाठी आज विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीला महाराष्ट्रात मताधिक्य मिळताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचं चित्र आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष नेतेपद’ (Opposition Leader position) मिळणं देखील अवघड असल्याची चर्चा सुरू आहे. मावळणकर रुल आणि विरोधी पक्ष नेतेपद पुन्हा चर्चेत आला आहे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

कोपरगावमध्ये महायुतीचा गुलाल! आशुतोष काळे यांचा दणक्यात दुसऱ्यांदा विजय

सन्माननीय स्वर्गीय गणेश वासुदेव मावळणकर हे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा देशात लोकशाहीची स्थापना झाली. तेव्हा बडोद्यातून निवडून येऊन लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले होते. लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की, विरोधी पक्षाला दहा टक्के सुद्धा जागा मिळालेल्या नाहीत. एकूण जागांच्या दहा टक्के सुद्धा जागा मिळालेल्या नाहीत. त्यावेळेस त्यांनी सभापती पदाच्या खुर्चीतून एका बाबीचा पुकारा केला विरोधी पक्ष म्हणून पुरेसे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या पदाला अर्थ राहणार नाही, म्हणून यापुढे जर सत्तेत नसलेल्या सर्वात मोठ्या पक्षाला एकूण लोकसभेतील जागांपेक्षा 10 ट्क्क्यांपेक्षा अधिक जागा मिळाल्या नाही, तर संसद संसदेत / लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद ( व पक्ष म्हणून मान्यता ) असणार नाही.

कोपरगावमध्ये महायुतीचा गुलाल! आशुतोष काळे यांचा दणक्यात दुसऱ्यांदा विजय

लोकशाहीमध्ये असे कायदे नियम महत्त्वाचे असतात. तसेच संसदीय लोकशाहीत संकेत देखील महत्त्वाचे असतात. संसदीय लोकशाहीचे कामकाज बऱ्याच वेळा संकेतांच्या आधारे सुद्धा चालते.माननीय गणेश वासुदेव मावळणकरांनी जो संकेत त्या दिवशी खुर्चीत बसून घालून दिला, तो मावळणकर रुल म्हणून प्रसिद्ध झाला ( डायरेक्शन्स 121 ऑब्लिक वन ऑब्लिक सी ) आणि आज तागायत अस्तित्वात आहेत. त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका सुद्धा झाल्या. पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा नियम उचलून धरला. त्याला कायद्या इतकंच महत्त्व आहे, असा निकाल दिला.

महाराष्ट्राच्या सध्याच्या आकडेवारी 288 च्या दहा टक्के म्हणजे एकूण 29 किंवा त्यापेक्षा अधिक इतक्या जागा सत्तेत नसलेल्या कोणत्याही एका पक्षाला मिळताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच मावळणकर रूल लागू होईल, विरोधी पक्ष नेता विधानसभेत कदाचित असणार नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आकडेवारी अधिक स्पष्ट होईल, असं डॉ. प्रशांत भामरे म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube