Maharashtra Assembly Election : मोठी बातमी! अजित पवारांचा कमबॅक, पहिल्या फेरीत आघाडीवर
Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार विरुद्ध पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. टपाल मोजणीमध्ये युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली होती मात्र आता अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे. अजित पवार पहिल्या फेरीनंतर 3 हजार 623 मतांनी पुढे आहे.
यावेळी राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये झाली आहे तर एक्झिट पोलमध्ये महायुतीची सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या समोर आलेल्या कलनुसार
भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आघाडीवर
साताऱ्यातून शिवेंद्रराजे
पाटणमधून शंभूराजे देसाई पोस्टल मतदानात आघाडीवर
कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर
राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून आघाडीवर
माहीम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे आघाडीवर
मुंबादेवीतून काँग्रेसचे अमिन पटेल आघाडीवर
पोस्टल मतदानात नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, अनुराधा नागवडे, राणी लंके, रोहित पवार, संग्राम जगताप आघाडीवर
रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर
कसबा पेठ मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत 640 मतांनी आघाडीवर धंगेकर यांना 5284 मते तर रासने यांना 4644 मते
कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, वडगाव शेरी, पर्वती आणि हडपसर या सर्व मतदारसंघात सर्व विद्यमान आमदारांची आघाडी
दुसऱ्या फेरी अखेर देखील अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरी अखेरीस अजित पवार यांनी 6 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
वडगाव शेरीत दुसऱ्या फेरीअखेर सुनील टिंगरे आघाडीवर सुनिल टिंगरे यांना 6697 मतांची आघाडी बापू पठारे यांना 5263 मते टिंगरे यांची 1434 मतांची आघाडी
माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर हे पहिल्या फेरीत 19 मताने आघाडीवर आहेत. जानकर यांना 4170 भाजपचे राम सातपुते यांना 4151 मते मिळालेली आहेत.
तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर सुनिल टिंगरे यांनी 2302 मतांची आघाडी घेतली आहे. तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चौथी फेरी अखेर महायुतीचे दिलीप वळसे पाटील 91 मतांनी आघाडीवर आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या फेरी अखेरीस काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर आहे. रमेश बागवे यांना तिसऱ्या फेरीअखेरीस 832 मतांची आघाडी मिळाली आहे. तर मावळ मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील शेळके चौथी फेरी अखेरीस 14946 मतांनी आघाडीवर आहे.