Opposition Meeting : नितीश कुमारांचा प्लॅन, ममतांचीही साथ पण, काँग्रेसने खेळच पलटविला!

Opposition Meeting : नितीश कुमारांचा प्लॅन, ममतांचीही साथ पण, काँग्रेसने खेळच पलटविला!

Opposition Meeting in Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात विरोधकांची एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांन नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. एक सीट एक उमेदवार या सूत्रावर चर्चाही केली होती.

यानंतर 12 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे बैठकीचे (Opposition Meeting in Patna) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधीही सहभागी होतील असे सांगितले जात होते. मात्र, काँग्रेसने नितीश कुमारांचा हा सारा खेळच पलटवून टाकला आहे. कारण, काँग्रेसे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोघेही या बैठकीला उपस्थितर राहणार नाहीत. मात्र, काँग्रेसशासित राज्यातील एखाद्या मुख्यमंत्र्याला या बैठकीसाठी पाठविण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये खळबळ! सचिन पायलट अखेर ‘तो’ निर्णय घेण्याच्या तयारीत

देशातील सर्वात जुना पक्ष आणि सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने घेतलेला हा निर्णय नितीश कुमार यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. नितीश कुमार यांनी जेव्हा राहुल गांधी आणि खर्गे यांची भेट घेतली होती त्यावेळी कर्नाटक निवडणुकीचे निकाल लागले नव्हते. या निवडणुकीत मिळालेल्या शानदार विजयानंतर काँग्रेसच्या वागणुकीत अचानक बदल झाला. पार्टीतील बहुतांश नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनविण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे, की भारत जोडो यात्रेमुळे राहुल यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. कर्नाटकातील विजय हा त्याचाच परिणाम आहे.

विपक्षी एकतेच्या मुद्द्यावर नितीश कुमार जितकी घाई करत तितकीच काँग्रेस या मुद्द्यावर शांत आहे. काँग्रेस सध्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटप किंवा पंतप्रधानपदासाठी कोणत्या दुसऱ्या नेत्याच्या नावावर विचार करण्यास तयार नाही, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळाली.

2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत

नितीश कुमार जरी म्हणत असले की त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा नाही तरी त्यांच्या पक्षातील बहुतांश नेते त्यांनीच पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे या बाजूने आहेत. 12 जून रोजी होणाऱ्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. अशातच आता मोठा प्रश्न समोर येत आहे की राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गैरहजेरीत होणाऱ्या या बैठकीला काय अर्थ राहणार आहे. तिसऱ्या आघाडीसारखीच याचा परिणाम तर होणार नाही ना अशाही चर्चा सुरू आहेत.

ममताच म्हणाल्या, बैठक पाटण्यात घ्या 

ममता बॅनर्जी यांना माहित आहे की काँग्रेसमध्ये आंतरिक लोकशाही फक्त नावालाच आहे. मात्र, व्यवहारात काँग्रेससु्द्धा हुकुमशाही प्रवृत्तीचीच आहे. गांधी परिवाराच्या मर्जीशिवाय येथे पानही हलत नाही. ममतांना वाटत होते की काँग्रेसची ही मक्तेदारी संपुष्टात यावी. विरोधी नेत्यांना दिल्लीत बोलावून भेटीचा हा सिलसिला बंद व्हावा. या दरम्यान कर्नाटकातील विजयाने काँग्रेसला बळ दिले. ममता बॅनर्जींना काँग्रेसला यश मिळाले याचा आनंद नाही तर भाजपाचा पराभव झाला याचा आनंद आहे. 12 जून रोजी पटना येथे बैठक घेण्याचेही ममता यांनीच सुचवले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube