पिंपळगाव : केवळ आमदराकी डोळ्यासमोर ठेऊन काही लोक माझ्या मागे फिरत होते, असा घणाघात सहकार मंत्री व महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांचे नाव न घेता केला आहे. ते पिंपळगाव (ख.) गावभेट दौऱ्यावेळी बोलत होते.
जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार; वळसे पाटलांची ग्वाही
आमदारकीसाठी माझ्या मागे फिरून सर्व शिकून घेतलं
निकम यांच्यावर हल्लाबोल करतान वळसे पाटील म्हणाले की, जे आजपर्यंत म्हणतायेत की, दिलीप वळसे पाटील यांनी काय केलं असा प्रश्न विचारणारेच काही वर्षांपूर्वी सकाळी पटकन येऊन माझ्या गाडीत बसायचे. एवढेच काय तर, जिकडे माझा दौरा असेल तिकडेच यांचा दौरा असायचा. पण त्यामागील त्यांचा हेतू वेगळा होता, त्यांना आमदार व्हायचं होतं म्हणून ते माझ्या मागे फिरून सर्व शिकून घेत होते हे आता लक्षात येत आहे, असा हल्लाबोलही वळसे पाटील यांनी निकम यांचे नाव न घेता केला.
विकास कामांमुळे आंबेगावची विशेष ओळख : दिलीप वळसे पाटील
बाजार समिती चांगली चालली होती. परंतु, आधीच्या चेअरमनने काही कारण नसताना धना मेथीचा बाजार बंद गेला. बैलबजार बंद केला. पण, आपले नवीन संचालक मंडळ बसल्यावर आपण धना मेथीचा बाजार पुन्हा चालू केला. तसेच सामान्य कुटुंबातील मुलांना महत्वाच्या खुर्चीवर बसण्याची संधी दिल्याचे वळसे पाटील म्हणाले. तालुक्यात ज्या संस्था सुरु केल्या त्यातून दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला व त्यातून त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. येथून पुढे केलेल्या एवढ्याच कामावर न थांबता भविष्यकाळात अजून पुढे जाणार असल्याचे आश्वासनही वळसे पाटलांनी उपस्थितांना दिले.
शाश्वत विकासकामांमुळे आपला अष्टविजय निश्चित; वळसे पाटलांना पूर्ण विश्वास
कुटुंबात सुबत्ता येणं फार महत्वाचं
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, पिंपळगावमध्ये फक्त एक डेअरी होती. त्यानंतर नदी, कालव्याचे पाणी पिंपळगावला मिळाले. गावातली शेती सुधारल्याने कुटुंबाची भरभराट झाली. चांगली घरे बांधली गेली. त्यातून आपले जीवन सुखकर झाले. गावच्या हायस्कूल ला इमारत नव्हती, मीच आग्रह धरला व आज सुंदर अशी इमारत उभी राहिली त्याचा फायदा मुलांना होईल असेही वळसे पाटील म्हणाले.
आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील
मुळामध्ये कुटुंबाचा उद्धार होणं, कुटुंबात सुबत्ता येणं फार महत्वाचं असून, त्यासाठी प्रथम दळण वळणाची साधन, शेतीला आणि पिण्याला पाणी, आरोग्य सुविध, शिक्षण या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात बदल करतात. आपल्याभागात मोठं कॉलेज उभं राहिल असा कुणी विचार तरी केला होता का? पण, याच कॉलेजमधून सहा हजार मुले इंजिनियर होऊन बाहेर पडली असून, या भागातील हा कायम स्वरुपी विकास झाला आहे.याचा आपल्या पुढील पिढीला पण लाभ होणार आहे.
आदिवासी बांधवांच्या पाण्याच्या प्रश्नावर काम करणार; वळसे-पाटलांचा गावभेटीवेळी शब्द
दूध प्रोसेस संस्थेमुळे रोजगाराची निर्मिती
पिंपळगावमध्ये फक्त एक डेअरी होती. त्यानंतर आपल्या परीसरात २० लाख लिटर दुध प्रोसेस करणारी संस्था या तालुक्यात झाली त्यातून रोजगार निर्माण झाला. त्यामुळे ३५ वर्षांत काय काम केलं व समोरचा उमेदवार आपल्याबद्दल काय बोलतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे असेही वळसे पाटील म्हणाले.