Maharashtra Assembly Election : काकाविरुद्ध पुतणा, वडिल विरुद्ध मुलगी अशी लढत विधानसभेला होत आहे. त्यात आता पत्नीविरुद्ध पती अशी लढतीचीही भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड (Kanad Assembly Constituency) विधानसभा मतदारसंघात होत आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदेसेनेकडून त्यांची पत्नी रंजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघेही वेगवेगळी राहतात. संजना जाधव ( sanjana Jadhav) या भाजप नेते व माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या आहे. त्यावरून हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी सासरे दानवे यांच्यावर यावरून निशाणा साधलाय.
Assembly Election 2024 : बीडमध्ये पवारांचे गणित चुकलंय; हक्काच्या जागा जाणार?
हर्षवर्धन जाधव हे 2009 आणि 2014 असे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत. सुरुवातीला ते मनसेकडून आमदार झाले होते. त्यानंतर 2014 ला ते शिवसेनेकडून निवडून आलेले आहे. ते कोणत्यात पक्षात रमले नाही. अनेक वादग्रस्त 2019 ला ते अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल 2 लाख 83 हजार मते घेतली होती. त्यामुळे मतविभाजन होऊन चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. यंदाही लोकसभेला ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना फक्त 39 हजार मतेच मिळू शकली होती. अनेक पराभव झालेले हर्षवर्धन जाधव आता अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. तर ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिलीय. कन्नडच्या निवडणुकीत ट्वीस्ट आला तो हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढण्याची निर्णय घेतला. रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिंदे यांच्याकडून त्यांना तिकीटही देण्यात आले. त्यामुळे या मतदारसंघात पती, पत्नी, उदयसिंह राजपूत असा तिहेरी सामना रंगणार आहेत.
उमेदवारी दोन मिनिटांनी हुकली; माजी मंत्री पुन्हा करणार काँग्रेसमध्ये वापसी
या सामना रंगण्यापूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर काही आरोप केले आहेत. माझे घरे फोडले आहे. माझ्या विरोधात साक्षात माझ्या पत्नीला उभे करण्याचे झालेले आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. मतदारसंघातील लोक यांना यांची जागा निश्चित दाखवतील, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. मला फक्त वेदना होतात हे सगळे म्हणत असताना, कारण शेवटी संसार माझा होता. पण असो ठोकून काढू कारण हे धर्मयुद्ध आहे. धर्मयुद्धात भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले हे आमचे तोंडपाठ आरहे. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठीमागे रावसाहेब दानवे असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केलाय.