कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे आता वय झालं आहे. त्यामुळे आता त्यांना जनतेनेच निवृत्त करावे असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ते डॉ. अतुलबाबा भोसले (Dr. Atulbaba Bhosale) यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. अतुलबाबा भोसलेंची ताकद वाढली, जिल्हा कुस्तीगीर संघाने दिला जाहीर पाठिंबा
विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवा
उपस्थितांना संबोधित करताना सावंत म्हणाले की, चव्हाणांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणती शाश्वत विकासकामे केली त्याबाबत सांगावे. एवढेच नव्हे तर, चव्हाणांना कोणतेही ठोस शाश्वत काम करता आले नसून, त्यांच्या काळातील एकही प्रकल्प आज पूर्णत्वास गेलेला नाही. या उलट 2014 ते 2024 पर्यंतच्या काळात कोणकोणती विकासकामे झाली, हे मी पुराव्यांनिशी दाखवतो असे सावंत म्हणाले. या सर्व बाबींचा आणि वयाचा विचार करता कराड दक्षिणच्या जनतेनं चव्हाणांना निवृत्त करून डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण, तडफदार, विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे असे आवाहन सावंत यांनी केले.
‘मतदारसंघाकडे ढुंकुनही बघितले नाही पण आता…’, पृथ्वीराज चव्हाणांवर डॉ. अतुलबाबा भोसलेंचा हल्लाबोल
अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल असे सावंत म्हणाले. मोदींनी जनधन योजना, मोफत धान्य, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, किसान डेबिट कार्ड आदींसह योजनांसह महिला सशक्तिकरण आणि युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती केल्याचे सांवतांनी सांगितले. याउलट काँग्रेसने आतापर्यंत जनतेला केवळ हात दाखवण्याचेच काम केले असल्याची टीका त्यांनी केली.