Sharad Pawar Announced Fourth List For Assembly Election : विधानसभेसाठी शरद पवारांकडून (Sharad Pawar) आणखी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा सलील देशमुख यांना काटोल येथून उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीसह शरद पवार गटाच्या उमेदवारांची एकूण संख्या ही 82 इतकी झाली आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/ewuUQGx4zu
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 28, 2024
सात जणांच्या यादीत कोण- कोण?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीत सात उमेदवारांच्या नावांचा समावेश असून, यात माणमधून प्रभाकर घार्गे, काटोलमधून सलील अनिल देशमुख, खानापूर – वैभव सदाशिव पाटील, वाई – श्रीमती अरूणादेवी पिसाळ, दौंड – रमेश थोरात, पुसद – शरद मैंद तर सिंदखेडामधून संदीप बेडसे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
भाजपची तिसरी यादी जाहीर, फडणवीसांचे PA सुमित वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात
अनिल देशमुखांच्या माघारीनंतर मुलाला उमेदवारी
काटोल मतदारसंघ हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाहून अनिल देशमुख हेच महाविकास आगआडीचे उमेदवार असतील असे मानले जात होते. मात्र, आपल्या उमेदवारीमध्ये रश्मी बर्वे यांच्याप्रमाणे अडथळ निर्माण केला जाऊ शकतो. यासाठी दिल्लीतून दिग्गज वकील आल्याचा दावाही देशमुख यांनी केला होता. यानंतर अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या माघारीनंतर अखेर या मतदारसंघातून अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माझ्या चुकीची पुनरावृत्ती पवारांकडून, आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत
सलील देशमुख विरूद्ध ठाकूर थेट लढत
पवारांच्या चौथ्या यादीपूर्वी भाजपकडून 25 उमेदवार असलेल्या तिसऱ्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. यात भाजपकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाकडून याच मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे आता ठाकूर विरूद्ध देशमुख अशी थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.