शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने घेतली मनोज जरांगेंची भेट; बैठकीत काय चर्चा ?

शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने घेतली मनोज जरांगेंची भेट; बैठकीत काय चर्चा ?

Manoj Jarange : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (Maharashtra Elections) सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. आतापर्यंत फक्त भाजपानेच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतील अन्य पक्ष उमेदवारी याद्या जाहीर करतील अशी शक्यता आहे. या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीसाठी नेते अन् इच्छुक उमेदवारांचा ओघ वाढत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सोमवारी रात्री मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत भेट घेतली.

चंद्रकांत दानवे जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात 500 रुपयांच्या (Maratha Reservation) बाँड पेपवरवर जो लिहून देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर उमेदवारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या घोषणेनंतर उमेदवारांचा ओघ वाढल्याचे सांगण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे (Ravsaheb Danve) पुत्र संतोष दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास चंद्रकांत दानवे इच्छुक आहेत. दरम्यान, या दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ठरलं! निवडून येतील त्याच मतदारसंघात उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

दरमयान, 500 रुपयांचा बाँड पेपर घेऊन उमेदवार आंतरवाली सराटीत पोहोचत आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंनी महत्वाचं आवाहन केलं आहे. तुम्ही थेट बाँड घेऊन आमच्याकडे येऊ नका. सध्या असं होतंय की कुणीही पाचशे रुपयांचा बाँड घेऊन यायला लागला आहे. जर एखाद्याकडे पैसे नसतील तर तो उसने पैसे घेऊन बाँड घेऊन येत आहे. मराठ्यांचं मतदान आहे म्हणून उगाच बाँड लिहीत बसू नका. अगोदर आमच्याशी संपर्क करा किंवा आम्हाला येऊन भेटा.

ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही त्याठिकाणी अन्य पक्षांचे कोण उमेदवार आहेत. अपक्ष असेल तर त्यांचेही मेरिट आम्ही तपासणार आहोत. जर एखाद्या उमेदवाराने बाँड पेपरवर लिहून दिलं नाही तर तेथील अपक्ष किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा जाहीर करू असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil : मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube