वाकडची साथ कमळालाच; वाकडमध्ये स्थानिक पातळीवर भाजपाला वाढता प्रतिसाद

PCMC Election 2026: वाकड विकासाचे रोल मॉडेल म्हणून विकसित झाले आहे. येत्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला गती मिळेल

  • Written By: Published:
Rahul Kalate Bjp Pcmc 2006

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC Election 2026) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपाच्या प्रचाराने वेग घेतलाय. पुनावळे, ताथवडेनंतर वाकड गावठाण येथे गुरुवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. वाकड यंदा पूर्ण ताकदीने ‘कमळा’ला साथ देईल असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे (Rahul Kalate), श्रुती राम वाकडकर, रेश्मा चेतन भुजबळ आणि कुणाल वाव्हळकर उपस्थित होते. जितेंद्रनाथ महाराज आणि बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांनी यावेळी विजयासाठी आशीर्वाद दिले.

वाकड गावठाण परिसरातील म्हातोबा मंदिर, दत्त मंदिर रोड, उत्कर्ष चौक, माऊली चौक, वाकड पोलीस स्टेशन, काळा खडक रोड मार्गे कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानापर्यंत भाजपच्यावतीने प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यादरम्यान चेतन भुजबळ, राम वाकडकर, विशाल आप्पा कलाटे, भारती ताई विनोदे, राजाभाऊ भुजबळ, वसंत कलाटे, गुलाब कलाटे, भरत आल्हाट, बाळासाहेब विनोदे, मोहनदादा भूमकर, हुषारशेठ भुजबळ, प्रकाश जमदाडे, शांताराम विनोदे, संपत विनोदे, राजू करपे, गबल वाकडकर, कांतिलाल भूमकर, संतोष पवार, लक्ष्मण मोहिते, अरुण वाकडकर, नरहरी वाकडकर, किसन वाकडकर, अनिल भुजबळ, विठ्ठल भुजबळ, अशोक भुजबळ, प्रवीण गायकवाड, नवनाथ ताजणे, भानुदास कुदळे उपस्थित होते.

VIDEO : उंटावरून शेळ्या हाकू नको; आमदार महेश लांडगेंचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर

यावेळी भाजपाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी स्थानिक ग्रामस्थ, आयटीयंस आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विकास हा विश्वासातून साधता येतो असे सांगितले. वाकड विकासाचे रोल मॉडेल म्हणून विकसित झाले आहे. येत्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला गती मिळेल असेही ते म्हणाले. नागरिकांनी मागील पंचवार्षिकमध्ये त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी आभार मानत आहे. येत्या निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.


आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही; संग्राम जगताप विरोधकांवर भडकले

वाकड विकासाचे मॉडेल बनून समोर येत आहे असे प्रतिपादन करत “कलाटे म्हणजे कमळ” अशी घोषणा देत राहुल कलाटे यांनी भविष्याची राजकीय दिशा स्पष्ट केली. कुणाल वाव्हळकर यांनी वस्ती भागातल्या प्रश्नांवर मांडणी केली. तर रेश्मा चेतन भुजबळ यांनी सरकार लवकरच लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीची योजनेची रक्कम देणार असे सांगितले. श्रुती राम वाकडकर यांनी येत्याकाळात सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वजण एकत्र प्रयत्न करतील अशी भूमिका मांडलीय.

वाकड आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी क्षेत्रातील कर्मचारी वास्तव्यास असून, त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या अडचणी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे सुदृढीकरण आवश्यक आहे. मेट्रोच्या विस्तारामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल, प्रदूषण कमी होईल आणि नागरिकांचा प्रवास सुलभ होईल, असे उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटलंय.

follow us