ठरलं! निवडून येतील त्याच मतदारसंघात उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

ठरलं! निवडून येतील त्याच मतदारसंघात उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange On Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पाडायचं की लढायचं? असा सवाल त्यांनी मराठा बांधवांना केलाय. यानंतर त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोणते उमेदवार उतरावायचे? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केलीय. जिथं निवडून येतील, तिथं उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा जरांगे पाटलांनी केलीय. एससी, एसटी ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नयेत. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्याला मतदान देऊन निवडून आणू. जिथं उमेदवार उभा करायचा नाही, तिथल्या उमेदवाराकडून बॉन्डवर लिहून घेऊ की, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

जिथे उमेदवार निवडून येतील, त्याच जागेंवर उमेदवार उभे करू या. परंतु तुम्ही सर्वात आधी फॉर्म भरा. ज्या ठिकाणी फॉर्म काढून घ्यायला सांगेल, तेव्हा फॉर्म काढून घ्यावा लागेल. बाकी, सगळे फॉर्म भरून घ्या. प्रत्येक मतदार संघातील गणित तपासून काय करायचं, हे मी सांगतो. असं मनोज जरांगे आज आंतरवाली सराटीत मराठा बांधवांना म्हणाले आहेत. फॉर्म काढताना विचार करून ते ठरवलं जाईल. परंतु, एखाद्याने जर तो अर्ज तसाच ठेवला तर त्याला मराठा उमेदवाराने मत द्यायची नाहीत असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.

अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अनेक दिवसांपासून गुलदस्त्यात ठेवलेली रणनिती सांगितली आहे. मनोज जरांगे पुढील तीन ते चार दिवसांत प्रत्येक मतदारसंघातील मतदारांचा आढावा घेवून कोणत्या कोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचा, हे निश्चित करणार आहेत. आता मनोज जरांगे यांच्या उमेदवारामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला किती फटका बसतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Manoj Jarange : अखेर उपोषण स्थगित; मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, म्हणाले कोर्टाचा आदर करतो

माझी निवडणुकीकडे जाण्याची इच्छा नाही. परंतु, मी समाजाच्या पुढे नाही. परंतु आपण राजकारणाकडे जाऊ नये, असं माझं मत आहे असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या समाजाचा लढा या नादात बंद पडला नाही पाहिजे. जर या नादात गेलोत तर समाज पुन्हा एकत्र येणं कठीण आहे. त्यामुळे आपण यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. दुभांगलेला समाज पुन्हा एकत्र आणणं कठीण आहे, असंही पाटील म्हणाले. जर आपण उमेदवार उभे केले तर भाजपवाले खुश होतात आणि नाही उभे केले तर महाविकास आघाडीवाले खुश होतात, असं सध्याचं चित्र आहे असंही जरांगे पाटील म्हणालेत.

Manoj Jarange : मोठी बातमी! अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

एखाद्याला निवडून आणायला मराठा जात मोठी ठरते. परंतु, एका जातीवर सगळे निवडून येत नाहीत. त्यामुळे आम्ही मधला मार्ग काढला आहे. कारण समाजाच्या भल्यासाठी मी काम करतोय. कुणी रागात बोलतं, कुणी विरोधामुळं बोलतं. परंतु असे निर्णय शांत डोक्याने घ्यावे लागतात. त्यामुळे सगळ्या बाजून विचार केला आणि ज्या ठिकाणी मराठे निवडून येतील तिथं उमेदवार द्यायचे असा फायनल निर्णय केला असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube