बुलढाणा : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (दि.29) शेवटचा दिवस आहे. मात्र, त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) राज्यात एक दोन ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होतील असे विधान केले आहे. फडणवीसांच्या या विधाननंतर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. (Devendra Fadnavsi On Mahyuti Friendly Fight In Assembly Election)
Devendra Fadnavis : सत्ता स्थापनेसाठी कुणासोबत जाणार?, प्रचार सुरू असतानाच फडणवीसांचं मोठ वक्तव्य
काय म्हणाले फडणवीस?
विधानसभेच्या तोंडावर महायुतीत बंडखोरी रोखण्याकरता आम्ही सर्व नेते एकत्रित बसू आणि जिथे जिथेज्या-ज्या पक्षाच्या लोकांनी फॉर्म भरला असेल त्या-त्या पक्षाचे लोकं त्यांना फॉर्म फरत घ्यायला लावतील. महायुती एक असून, आमचा उमेदवार जो अधिकृत उमेदवार आहे तोच आमचा अधिकत उमेदवार असल्याचे फडणवीस म्हणाले. जिथे कमळ दिलं आहे तिथे कमळच आमचा उमेदवार आहे. जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाणचं उमेदवार असून, जिथे घड्याळ तिथे घडळ्याचं आमचा उमेदवार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. मात्र, एकद दुसऱ्या ठिकाणी आमच्यात मैत्रीपूर्ण लढत असेल असेही फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या विधानाचे पडसाद पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात पडणार की काय याची आता चर्चा सुरू झाली आहे.
माझ्या चुकीची पुनरावृत्ती पवारांकडून, आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत
वडगाव शेरीतून सुनील टिंगरेंना उमेदवारी
विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हेदेखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, येथून टिंगरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.
या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, असा अंदाज याआधी व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता खुद्द फडणवीसांनीच एक-दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करू असे विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे मुळीक यांच्या समर्थकात आनंदाचे वातावरण पसरले असून, पुढील काही तासात मुळीक यांना भाजपचा अधिकृत उमेदवारीचा अर्ज मिळणार की काय? याची चर्चा पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
आघाडीचे पाच मतदारसंघात दोन एबी फॉर्म; ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत होणार?
मोर्शीमध्येही महायुतीकडून दोघांना उमेदवारी
एकीकडे फडणवीसांच्या विधानानंतर वडगाव शेरीत मुळीक समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असतानाच दुसरीकडे मोर्शी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार यांना तर, भाजपकडून उमेश यावलकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातदेखील मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या ठिकाणी भाजप की, राष्ट्रवादी माघार घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.