महायुतीत तणाव! आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवेत…; मुळीकांची थेट मतदारांना साद
Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली. महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपावरून अजितदादा गट आणि भाजपमध्ये (BJP) दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. अशातच आता वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाववर भाजप नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दावा ठोकला. हा मतदारसंघ सध्या अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्याकडे आहे. आणि आता मुळीक यांनी दावा ठोकल्याने भापज आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
डबल इंजिन सरकार की काँग्रेस बाजी मारणार? हरियाणाचा 30 वर्षांचा ट्रेंडही खास…
आपली साथ, प्रेम आणि आशिर्वाद पुन्हा हवेत असं म्हणत मुळीक यांनी थेट मतदारांना साथ घातली.
काय आहे जगदीश मुळीक यांचं पत्र
सदैव जनतेसाठी, जनतेच्या सेवेसाठी !
आपले आशीर्वाद द्या !
नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो,
पत्ररूपाने तुमच्याशी संवाद साधताना मनात कृतज्ञतेची भावना आहे. माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाप तुमच्या सहकार्याने बहरली. तुमचे प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद भरभरून लाभले. माझ्यासाठी हे आशीर्वाद बहुमोल आहेत. माझ्या विस्तारित कुटुंबाशी म्हणजे तुमच्याशी संवाद साधताना खूप समाधानाची भावना आहे. कुटुंबातूनच मला समाजकार्याचे बाळकडू मिळाले. समाजकार्याचा पिंड जोपासला गेल्यानेच 2001 मध्ये विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय प्रवास सुरू झाला, असं मुळीक म्हणाले.
धक्कादायक! शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आपटेला 26 लाख, बाकी राणेंसाठी लोकसभेत खर्च
पुढं त्यांनी लिहिलं की, तुमच्यामुळेच मला 2014 मध्ये वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्या पाच वर्षांत, आपल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतदारसंघाला एक नवे रूप दिले. भामा आसखेड, 100 खाटांचे रुग्णालय, मेट्रो, उड्डाणपूल यासारखे अनेक प्रकल्प मार्गी लावले. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत कृतीशील राहिलो.
लढण्यसाठी सज्ज झालो
आपल्या अथक प्रयत्नानंतरही २०१९ मध्ये विधानसभा गाठण्यात थोडक्यात अपयश आले. पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. तुमची साथ होतीच, त्यामुळं दुप्पट जोमाने लढण्यसाठी, समाजसेवेसाठी सज्ज झालो.
भाजपचे शहराध्यक्ष असताना राज्यातील तत्कालीन सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याची आणि आरोग्यसेवा पुरवण्याची गरज होती. ती पक्षसंघटनेच्या माध्यमातून पूर्ण केली. विकासकामांसाठी आणि लोकांच्या हक्कासाठी आंदोलने केली, पक्षसंघटना वाढवली आणि मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहिलो. शिक्षक सन्मान, विद्यार्थी सन्मान, महिला सन्मान, आरोग्य शिबिरे, स्पर्धांचे आयोजन, सर्व सार्वजनिक उत्सव, बागेश्वर धाम, जया किशोरी यांचे प्रवचन अशा अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत गेलो.
आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवेत
विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल. याच हेतुने आपल्याशी हा संवाद. तुमचे सहकार्य लाभेल हा विश्वास, असं मुळीक म्हणाले.