Download App

महायुतीत 6-1 चा फॉर्म्युला ठरला? भाजपला 22, शिंदेंना 12 तर अजितदादांच्या शिलेदारांनाही संधी…

Maharashtra CM : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीकडे लागले आहे. महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार

  • Written By: Last Updated:

Maharashtra CM : संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडीकडे लागले आहे. महायुती (Mahayuti) राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. 05 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेऊ शकतात. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार महायुतीमध्ये सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. माहितीनुसार, महायुतीमध्ये 6-1 फॉर्म्युलावर एकमत झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार महायुतीमध्ये सत्तावाटपासाठी 6-1 फॉर्म्युलावर सहमती झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार तिन्ही पक्षाला 6 आमदारांमागे एक मंत्रीपद दिले जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या वाटेला 20-22 मंत्रिपदे, शिवसेना (शिंदे गट) 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9-10 मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे उद्या (4 डिसेंबर) भाजप विधिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भाजप आमदार विधिमंडळाचा नेता निवडणार आहे. यानंतर महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येऊन राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या गृह खात्यावरून रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप नेतुत्वाकडे उपमुख्यमंत्रीपदासह गृहखाते मागितले असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर भाजप गृहखाते सोडायला तयार नसल्याने एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले असल्याचा देखील दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. तसेच शिवसेनेकडून पीडब्ल्यूडी, नगरविकास आणि अर्थ खात्यावर देखील दावा करण्यात येत आहे. तसेच गृह विभागासह विधानसभा अध्यक्ष पदावरून देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना इतके मंत्रीपदे मिळाले पाहिजे असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, त्यामुळे मंत्रिपदेही त्यानुसार दिली पाहिजेत. असं माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत 236 जागांवर विजय मिळावला आहे. महायुतीमध्ये भाजपने सार्वधिक जागा जिंकले आहे. भाजपला 131 तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाले आहे.

मोठी बातमी! दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू, राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची घोषणा

तर महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर यश मिळाला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 जागा मिळाले आहे.

follow us