मोठी बातमी! दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू, राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांची घोषणा
South Korean : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार दक्षिण कोरियामध्ये (South Korean) मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी मार्शल लॉ (Martial Law) लागू केल्याची घोषणा केली आहे. यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल ( Yoon Suk Yeol ) यांनी विरोधकांवर गंभीर आरोप देखील केले आहे.
संवैधानिक व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी देशात मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे असं त्यांनी राष्ट्राला संबोधित करताना माहिती दिली. तसेच विरोधी पक्षांनी देशाला संकटात टाकण्यासाठी संसदीय प्रक्रियेला ओलीस ठेवले आहे. असं देखील ते म्हणाले.
उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून दक्षिण कोरियाचे रक्षण करण्यासाठी आणि राज्यविरोधी घटकांना नष्ट करण्यासाठी आणीबाणीचा मार्शल लॉ घोषित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी सांगितले. तसेच लोकांच्या रोजीरोटीची पर्वा न करता, विरोधी पक्षाने केवळ महाभियोग, विशेष तपास आणि आपल्या नेत्याला न्यायापासून वाचवण्यासाठी राजवटीला लकवा मारला आहे. असे ते म्हणाले.
South Korean President Yoon Suk Yeol declared martial law. Yoon said he had no choice but to resort to such a measure in order to safeguard free and constitutional order, saying opposition parties have taken hostage of the parliamentary process to throw the country into a crisis,… pic.twitter.com/vztOXtjPMu
— ANI (@ANI) December 3, 2024
‘मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का’ म्हणणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप
विरोधकांवर आरोप
यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील गंभीर आरोप केला आहे. अमली पदार्थांविरुद्धच्या मोहिमेसह आणि सार्वजनिक सुरक्षा कार्यक्रमांमध्ये कपात करण्यासह देशाच्या मुख्य कार्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रमुख बजेटमध्ये कपात केल्याचा केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.