विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाची विजयी मोहोर, ऑलम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाला नमवलं
World Cup Archery Tournament Indian Mens Team Win : विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेमध्ये ( World Cup Archery Tournament ) भारतीय पुरुष संघाने ( Indian Men’s Team ) घवघवीत यश संपादन करत. सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या विजयामध्ये भारतीय संघाने ऑलम्पिक विजेत्या दक्षिण कोरियाचा ( South Coria ) पराभव करत हा विजय मिळवला आहे.
एचडी देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ, एसआयटी स्थापन होतोच देशातून फरार
या संघामध्ये भारतीय खेळाडू धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव या खेळाडूंचा सहभाग होता. भारताने मिळवलेला हा विजय तब्बल 14 वर्षांनी ऑलम्पिकमध्ये खेळला जाणाऱ्या रिकव्हर्स प्रकारात मिळवला आहे. दुसरीकडे महिला एकेरीमध्ये मात्र दीपिका कुमारीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर या स्पर्धेत भारताने एकूण पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवलं आहे.
Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, चाहत्यांमध्ये उत्साह
या अगोदर भारतीय संघाने या खेळामध्ये 14 वर्षांपूर्वी शेवटचे सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यावेळी देखील भारतीय संघात तरुणदीप रायने आपलं योगदान दिलं होतं. त्यानंतर आता वयाच्या 40 व्या वर्षी देखील त्यांनी भारताच्या ऐतिहासिक विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यावेळी तरुणदीप राय, राहुल बॅनर्जी आणि जयंत तालुकदार या भारतीय संघाने जपानला हरवत सुवर्णपदकाला गवसनी घातली होती.