महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलसाठी भारतीय संघात मोठा बदल; आधी डावलले पण आता शेफाली वर्माचे नशिब फळफळले !

Shafali Verma : संघ निवडताना शेफालीला डावलण्यात आले होते. तिला राखीव खेळाडू म्हणून निवडले नव्हते. परंतु आता ती थेट संघात आली आहे.

  • Written By: Published:
Shafali Verma Replaces Injured Pratika Rawal In India's World Cup Squad Ahead Of Semi Final 2

Shafali Verma replaces injured Pratika Rawal: महिला वर्ल्डकपच्या (ICC Women’s World Cup 2025) सेमाफायनलमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे.कारण वर्ल्डकपमध्ये ( World Cup) दुसऱ्या क्रमांकाच्या धावा करणारी रन मशीन प्रतिका रावल (Pratika Rawal) जायबंदी झाली आहे. तिच्या जागी आता तशीच स्फोटक फलंदाज संघात दाखल झाली आहे.संघ निवडताना शेफालीला (Shafali Verma ) डावलण्यात आले होते. तिला राखीव खेळाडू म्हणून निवडले नव्हते. परंतु आता ती थेट संघात आली आहे. तिच्या जागी रावल हिची निवड करण्यात आली होती.रावल ही स्मृती मानधनाबरोबर ओपनिंग जोडी म्हणून खेळायला येत होती. आता स्मृती मानधना व शेफाली वर्मा डावाची सुरुवात करतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 30 ऑक्टोबरला सेमीफायनल होणार आहे.

‘आमचा ट्रेलर बघू नका!’ ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन चर्चेत

शेफाली वर्माचा स्फोटक फलंदाज
शेफाली वर्माने गेल्या वर्षी प्रथम श्रेणीमध्ये 152 च्या स्ट्राइक रेटने 527 धावा केल्या होत्या. त्यात तिने बंगालविरुद्ध 115 चेंडूत 197 धावांची जबरदस्त खेळी केली होती. तर ती आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळते. गेल्या वर्षी तिने 304 धावा केल्या होत्या. (Shafali Verma replaces injured Pratika Rawal in India’s World Cup squad ahead of semi-final)


संपदा हॉटेलला गेल्यानंतर ती रात्रभर प्रशांतला…, रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती?


रावल बांगलादेशविरुद्ध खेळताना जखमी

वर्ल्डकपमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणारी रावल ही बांगलादेशविरुद्ध खेळताना जखमी झाली. तिच्या पायाला दुखापत झाली होती. त्या सामन्यात ती फलंदाजी करू शकली नाही. त्यामुळे मानधनाबरोबर अमनजोत कौर ही ओपनिंगला आली होती. रावलने या वर्ल्डकपमध्ये सहा मॅचमध्ये 308 धावा केलेल्या आहेत. तिने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 75 आणि न्यूझीलंडविरुद्ध 122 धावांची शानदार खेळी केली होती.


हे पर्याय होते पण

अमनजोत व्यतिरिक्त सेमीफायनलसाठी सलामीवीरसाठी हरलीन देओल हिचा पर्याय होता. उमा छेत्रीही सलामीला येऊ शकलरी असती. तिने न्यूझीलंडविरुध्दच्या सराव सामन्यात चांगली खेळी केली होती. राखीव खेळाडूमध्ये तेजल हसबनीस ही एकमात्र फलंदाज होती. परंतु तिला मुख्य संघात घेण्यात आले नाही. आता शेफाली वर्माला संघात घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द सेमीफायनल नवी मुंबईत खेळविली जाणार आहे.

follow us