ओमानमध्ये 24 तासांत तिसऱ्या व्यापारी जहाजावर हल्ला; जहाजावर 20 भारतीयांचा समावेश

merchant vessel attacked in Oman ओमानच्या शिनास बंदरावर पुन्हा एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला आहे. यामध्ये 20 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

Merchant Vessel Attacked In Oman

Third merchant vessel attacked in Oman within 24 hours 20 Indians among those on board : अमेरिका इराण युद्धामध्ये तासा-तासांमध्ये विविध बातम्या समोर येत आहेत. यात आता ओमानच्या शिनास बंदरावर पुन्हा एका व्यापारी जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 20 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

मागण्या त्याच रूप नवं! हुंडा हा शब्द बंद झाला, पण प्रथा परंपरांच्या नावाखालच्या लग्नातील देवाण-घेवाणीचं काय?

सुत्रांच्या माहितीनुसार या जहाजाचं नाव एमटी जलवीर असं आहे. मात्र याबाबत आणखी माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर मागील 24 तासांत भारतीय खलाशी असलेल्या दुसऱ्या जहाजावर अमेरिकेच्या नौदलाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर भारताकडून ओमानच्या राजदुतांना कठोर शब्दांत समज देण्यात आलीयं. त्यानंतर आता भारताचं तिसरं जहाज लक्ष्य करण्यात आलं आहे.

ओमानमधील भारतीय दुतावासाने या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं की, आम्ही स्थानिक अधिकारी आणि संस्थांशी संपर्कात आहोत.

बातमी अपडेट होत आहे…

follow us