मागण्या त्याच रूप नवं! हुंडा हा शब्द बंद झाला, पण प्रथा परंपरांच्या नावाखालच्या लग्नातील देवाण-घेवाणीचं काय?

dowry भारतातील विवाहसंस्थेमध्ये काळानुरूप बदल होत गेले. मात्र एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे हुंडा.

Dowry

‘dowry’ word fallen out but what about exchanges during weddings under guise of customs and traditions : भारतातील विवाहसंस्थेमध्ये काळानुरूप बदल होत गेले. मात्र एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे हुंडा. आता तुम्ही म्हणाल हुंडा तर बंद झाला आहे किंवा सध्याच्या कोणत्याही विवाहांमध्ये हुंड्या द्या असं म्हटलं जात नाही. मात्र खरी गोम तिथेच आहे. तो थेट मागितला जात नसाल तरी देखील अनेक प्रथा परंपरा, भेटवस्तू , हौस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक दडपण या कारणांमुळे ज्या काही गोष्टी लग्नामध्ये दिल्या जातात तोच आहे. आजच्या काळातील हुंडा. चला तर जाणून घेऊ भारतील विवाहांवर होणारा खर्च, भेटवस्तू अन् वधुंचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन याबाबत… यासाठी एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीने केलेल्या अभ्यास आणि केस स्टडीज जाणून घेऊ…

फॉलोअर्सच्या संख्येतील चढ-उतार संशयास्पद; Cockroach Janta Party च्या इंस्टाग्राम खात्याविरोधात तक्रार

2024 मध्ये भारतातील विवाह संबंधी उद्योगांमध्ये अंदाजे तब्बल 10 लाख कोटींचा खर्च केला गेला. ज्यामध्ये हिंदू परंपरेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय काळ म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर या 45 दिवसांचा राहिला. यामध्ये 5.9 लाख कोटींची उलाढाल झाली. जी मागच्या वर्षी 4.7 लाख कोटी होती. तर 2026 मध्ये या उद्योगांमध्ये 14 लाख कोटींची उलढाल होण्याची आपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Video : अभिजीत दिपके अन् PM मोदींची अमेरिकेत भेट?; राऊतांचा मोठ्या गौप्यस्फोटाने खळबळ

यामध्ये देशातील लखपतींच्या कडून लग्नात केला जाणारा सर्वाधिक खर्च हा नवरीचे कपडे, दागिने, विवाहस्थळं, मेजवानी, सजावट, प्रवास आणि हॉटेल्स आणि लॉज यांच्यावर केला जातो. तर त्यापेक्षा कमी आर्थिक परिस्थिती असणारा वर्ग कमी खर्च करतो पण तो देखील त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत दुप्पट असतो. मग उच्च अर्थिक स्तरावरील लोकांचा तर प्रश्नच नाही.

Iran-Amarica War : अमेरिकन नौदलाचा व्यापारी जहाजावर हल्ला, जहाजात 24 भारतीय कर्मचारी, 3 भारतीय बेपत्ता

हा झाला लग्नावरील खर्च मात्र यामध्ये लग्नात केल्या जाणाऱ्या विविध मागण्या त्यादेखील काही कमी आवाढव्य नसतात. एका अहवालातील आकडेवारीनुसार 2024-25 या वर्षामध्ये भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी लग्नासाठी तब्बल 15.5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. हा झाला सर्व दिसणारा खर्च मात्र जो छुपा खर्च असतो तो वेगळाच. ज्यामध्ये सोनं, नवरदेवाला दिले जाणारे विविध गिफ्ट्स, घरातील विविध वस्तूंचे मोठमोठे खर्चही असतात. ज्यामध्ये फर्निचर, फ्रिज, भांडी, टीव्ही, वॉशिंग मशीन कधी टू व्हीलर तर कधी थेट फोर व्हीलर. तर काही राज्यांमध्ये थेट सुटकेस भरून कॅश देण्याच्याही प्रथा आहेत.

पुढे सगळं आलबेल असेल असं नाही…; वाढदिवसापूर्वी राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना भविष्यासाठी भावनिक साद

त्याचे एक उदाहरण म्हणजे सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर अरुण पनवार याच्या लग्नात तब्बल 71 लाख रुपये कॅश, अंदाजे 29 लाखांचं सोनं दिलं गेलं, तर दुसरी एन्फ्लुएन्सर असलेली मानसी हिच्या पालकांनी देखील तिच्या लग्नात सात लाखांची रोकड दिली, तसेच राजस्थानमधील एका नवरदेवाला भेटवस्तूंच्या रूपात तब्बल 15 कोटी रुपये देण्यात आले. एकीकडे हुंडाबंदी असताना अशा प्रकारे प्रथा परंपरांच्या नावाखाली लग्नात हा छुपा हुंडा दिला जातो त्याला खत पाणी घातलं जातं आणि समाजात ते रुजवलं जातं. त्यामुळे अशा प्रथा परंपरांच्या नावखाली दिल्या जाणाऱ्या हुंड्यांची देशातील काही गाजलेली उदाहरणं पाहूयात…

इंधनाचे दर कमी होणार? इथेनॉलयुक्त पेट्रोलला उत्पादन शुल्कातून सुट, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

याचं पहिलं उदाहरण आहे ते म्हणज एका व्यक्तीच्या बहिणीचं नुकतच 2026 मध्ये लग्न झालं आहे. तो म्हणाला या लग्नामध्ये सरळ-सरळ सगळा खर्च माझे वडील आणि आम्हा भावांना करायचा होता. खर्च वाटून घेण्याबद्दल काहीही चर्चा झाली नाही. नवरदेवाकडची मंडळी त्यांच्या 80 पाहुण्यांना घेऊन आली आणि त्यांनी प्रत्येकासाठी भेट म्हणून पॉकेटमधून रक्कम देण्याची मागणी केली. ही रक्कम जवळपास एक लाखाच्या घरात गेली. हा व्यक्ती उत्तर भारतातील एका शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. त्याने कबूल केले की हुंड्याची उघड मागणी करण्यात आली नाही. आम्हालाही कोणताही बडेजाव करायचा नव्हता मात्र माझी बहीण आणि तिचा पती हे दोघेजण त्यांचं नवीन आयुष्य संसार सुरू करणार होते. त्यामुळे कपडे, फर्निचर, घरगुती विविध उपकरणं हे आम्ही दिलं.

Iran-America War : पुन्हा युद्धाची सुरुवात! इराणकडून अमेरिकेच्या 18 लष्करी तळांवर हल्ले, कुवेतमध्ये वाजलं सायरन!

त्याला जेव्हा विचारलं की मुलीचा नवरा या सर्व गोष्टी विकत घेण्याएवढं कमावत होता का? तर तो म्हणाला हो, मात्र या सर्व गोष्टी घेताना त्याने कोणताही नकार दिला नाही. वरून नवरदेवाच्या बाजूने चर्चेसाठी आलेल्या व्यक्तीने आम्हाला तुम्ही काय-काय देणार आहात? हेही विचारलं जे आमच्याकडे अगोदरच आहेत ते परत दिल्यास एक गोष्ट डबल होऊ नये यासाठी.

Rain Alert : विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा…

एवढं सगळं देऊन देखील काही प्रकरणांमध्ये जे घडायचं तेच घडतं. याचे उदाहरण म्हणजे मे महिन्यात भोपाळमध्ये स्वतःच्या शहरात मृत अवस्थेत आढळलेली नववधू ट्विशा शर्मा. तिच्या मृत्यू मागे देखील तिच्या कुटुंबीयांनी भेटवस्तू आणि परंपरांच्या नावाखाली दिला जाणारा एक प्रकारचा हुंडा न देणे हेच कारण असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणामध्ये ट्विशाच्या सासरच्यांकडून करण्यात येणाऱ्या मागण्या या ट्विशाच्या माहेरच्या लोकांनी केवळ परंपरा म्हणून बघितल्या ज्यामध्ये त्यांनी यातून तिच्या जीवावर बेतू शकतं हा धोका ओळखलाच नाही आणि अखेर तिचा मृत्यू झाला.

‘नेहरुंची मोदींसोबत तुलना होऊ शकत नाही’; शरद पवारांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले?

दुसरं प्रकरण आहे ते एका 2012 मध्ये विवाह झालेल्या महिलेचं जिने तिच्या सासारच्यांकडून केल्या जणाऱ्या मागण्यांचा पर्दफाश केला. तिला आम्ही विचारलं की, जेव्हा तुमच्या लग्नाची बोलणी सुरू होती. तेव्हा तुमच्या सासरच्या लोकांच्या मागण्या काय होत्या? त्यावर ती म्हणाली की, त्यांनी थेट मागण्या केल्या नाही. मात्र ते म्हणाले की, आमच्या मोठ्या सुनेच्या माहेरवरून आम्हाला ज्या गोष्टी दिल्या गेल्या त्या हिच्याकडूनही मिळायला हव्यात.

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘लगान’ला 25 वर्षे पूर्ण: 13 जूनला आमिर खानकडून ग्रँड पार्टी, संपूर्ण कलाकार, तांत्रिक टीम राहणार उपस्थित

पुढे ती म्हणाली, त्यांनी मला लग्नानंतरदेखील हुंड्यासाठी काहीही त्रास दिला नाही. जो काही पैसा मझ्या घरून आला तो माझ्यावरच खर्च केला गेला. त्यातून त्यांनी माझ्याचसाठी दागिने केले. पण लग्नासाठी त्यांनी जो खर्च करायला हवा होता तो त्यांनी न करत माझ्या वडिलांना करायला लावला. ही गोष्ट मला खटकली. कारण माझ्या वडिलांना त्यांचा मेडिकलचा खर्च आहे. त्यांचं कुटुंब आहे. पण हे सगळं इतकं सामान्य झालं की, मी त्या विरूद्ध काही आवाज उठवणार नव्हते. लग्न करणार नाही असंही म्हणणार नव्हते.

विदर्भातील शाळा 30 जून रोजीच सुरु होणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

तेव्हा तुम्ही मुलगी होतात. मात्र आता तुम्हाला मुलगा आणि मुलगी आहे. आता या व्यवस्थेबाबत तुमचं काय मत आहे? त्यावर ती म्हणाली की, आता मला कळतयं की, हे चुकीच आहे. त्यामुळे जेव्हा माझ्या मुलाचं लग्न होईल तेव्हा मी कोणतीही मागणी करणार नाही. तसेच माझ्या मुलीने तिचा जोडीदार निवडावा. त्यांचं लग्नही कोणत्याही मागण्यांशिवाय व्हावं. असं मला वाटतं. पण ती मुलगी असल्याने मुलाच्या घरच्यांनी काही मागण्या केल्या तर मी त्या कदाचित काही भेटवस्तू मुलीला द्यायला हव्या म्हणून पूर्ण करेन. पण मला मझ्या मुलीचं लग्न मला अशा घरात लावून द्यायला आवडणारच नाही. जे लोक अशा मागण्या करतात.

भेसळ ओळखा, सुरक्षित अन्न निवडा; फूड सेफ्टी ऑन व्हील्स मोहिमेतून प्रशासनाकडून नागरिकांना मार्गदर्शन

याबाबत तुमच्या पतीला काय वाटतं? तसं विचारलं असता ती म्हणाली की, त्याचे विचार वेगळे आहेत. मला माझ्या मुलांच्या लग्नासाठी पैसे साठवायचे आहेत. पण तो म्हणतो की, आपल्याला पैसे साठवायची गरज काय? जर त्यांना लग्न करायचं असेल तर ते कर्ज घेतील. मी त्यांच्या लग्नावर काहीही खर्च करणार नाही.

राहुरी पोटनिवडणूक, विधान परिषद आणि आता शिर्डी संस्थान; दरवेळी माझं नाव चर्चेत येतं आणि पत्ता कट होतो! सुजय विखेंचा मिश्किल टोला

यावर समाजशास्त्रज्ञ अंबिका चोप्रा यांनी सांगितलं की, आपल्या समाजामध्ये महिलेला आजही परावलंबी म्हणजे जीला कुणी तरी सांभाळण्याची गरज आहे. असं मानलं जातं. त्यामुळे तिला सांभाळण्यासाठी माहेरचे लोक सासरच्यांना पैसे देतात. आजकाल उच्च-मध्यम वर्गमध्ये ही हुंड्याची मागणी उघड केली जात नसली तरी देखील ती विविध प्रथा परंपरा आणि हौसेच्या नावाखाल दिल्य जाणाऱ्या भेटवस्तूनच्या रूपात दिली जात असल्याचं आपण सोशल मिडीयावरील रील्समध्ये पाहतो.

follow us