राज्यात बहुचर्चित हगवणे प्रकरणात चर्चेत आलेला ‘हुंडा’ हा शब्द कुठून आला? त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या…

राज्यात बहुचर्चित हगवणे प्रकरणात चर्चेत आलेला ‘हुंडा’ हा शब्द कुठून आला? त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या…

‘dowry’, which spotlight in Vaishnavi Hagawan case in the state, What is its exact meaning? Find out : पुण्यासारखं शिक्षणाचं माहेरघर समजलं जाणारं शहर, राजकीय पार्श्वभूमी असलेलं तथाकथित प्रतिष्ठित कुंटुंब मात्र राज्यात गाजतय ते सूनेच्या संशयित आत्महत्या किंवा हत्येसाठी मी बोलत आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत. याबाबत रोज काही तरी नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणातील पिडीतेला न्याय मिळावा आणि पुन्हा अशा प्रकारे छळछावणी लावण्याचा विचार देखील लोकांच्या डोक्यात येऊ नये अशी कडक शिक्षा आरोपींना व्हावी अशीच भावना सध्या सर्वत्र व्यक्त होतेय. मात्र आज आपण जाणून घेणार आहोत हे मृत्यू प्रकरण ज्या हुंड्याच्या कारणामुळे गाजत आहे. तो हुंडा हा शब्द नेमका कुठून आला? याबद्दल.

ब्रेकिंग : राज्यभरात EV वाहनांना टोलमाफी, फडणवीस सरकारच्या धडाकेबाज निर्णयाचे आदेश निघाले

हुंड्यासाठी लग्न मोडलं किंवा हुंड्यासाठी बळी घेतला गेला या बातम्या आपण रोज कुठे ना कुठे तरी एकतो. मात्र हा शब्द आपल्या मराठी भाषेत थेट लॅटीन भाषेतून आला आहे. डोटारे या लॅटीन शब्दावरून हुंडा हा शब्द तयार झाला आहे.ज्याचा अर्थ होतो देणे किंवा वाटून देणे. तर त्याचा मूळ अर्थ हा लग्नामध्ये वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाला देण्यात येणारी मालमत्ता असा होतो. संस्कृतमध्ये याला दहेज, उर्दुमध्ये जाहेज आणि इंग्रजीत डावरी म्हटलं जात.

अजित पवारांचा आयपीएस जालिंदर सुपेकरांना फोन; हगवणे प्रकरणावरून दिला ‘हा’ थेट इशारा

आता पाहुयात हा शब्द भारत आणि मराठीत कसा आला? त्याचं मूळ मध्ययुगात पाहायला मिळतं. त्यावेळी लग्नानंतर वधूचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाकडून रोख किंवा वस्तू स्वरूपात भेटवस्तू दिल्या जात होत्या. ही पद्धत युरोप, भारत, आफ्रिका आणि जगातील अनेक भागात प्रचलित होती. ब्रिटिशांनी मात्र ही पद्धत बंद केली.

“निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच मला राजीनामा मागितला होता”, भुजबळांचा गौप्यस्फोट

मात्र हुंडा आणि स्त्रीधनामध्ये देखील फरक आहे. महिलेला माहेर किंवा सासरहून मिळणारी मालमत्ता त्याचबरोबर लग्नात आणि त्यानंतर वा आधी स्त्रीला मिळणाऱ्या भेटवस्तू आणि मालमत्ता म्हणजे स्त्रीधन ज्यावर फक्त संबंधित स्त्रीचाच अधिकार असतो. ते कुणी हिसकावण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात न्यायलयात दाद मागता येते. त्याला हुंडा म्हणता येणार नाही.

तमन्ना भाटिया ‘मैसूर सँडल सोप’ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; कर्नाटकात लोक का संतापले?

तर भारतीय संविधानामध्ये देखील हुंडाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार हुंडा घेणाऱ्यास 5 वर्ष सक्तमजुरी आणि 15000 रूपयांपर्यंत दंड केला जातो. तर केवळ हुंडा मागण्यासाठी देखईल 6 महिन्यांपर्यंत कैद आणि 10000 रूपयांपर्यंत दंड केला जातो. तसेच एखादी विवाहिता लग्नानंतरच्या 7 वर्षांच्या आत मरण पावल्यास याची खात्री केली जाते. की, ती हुंडाबळी गेली आहे किंवा इतर काही कारणं आहेत. ते सिद्ध झाल्यास पती आणि संबंधित नातेवाईकांना कमीत कमी सात वर्ष आजीवन कारावास होऊ शकतो. तर देशातील हुंडाबळींची आकडेवारी सांगायची झाल्यास एका तासाला एक महिला हुंड्यासाठी मरण पावते 2007 ते 2011 मध्ये या मध्ये प्रचंड वाढ झाली. तर 2012 मध्ये देशातीव विविध राज्यातून अशी 8,233 प्रकरणं समोर आली होती.

अंजली दमानियांचा हगवणे कुटुंबासह या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

दरम्यान ही कायद्याने ही प्रथा जरी बंद झाली असली. तरी देखील ती अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे आजही कायम आहे. श्रीमंत आणि गर्भ श्रीमंत कुटुंब त्यांच्या मुलींच्या सुखासाठी आजही मुलाच्या घरच्यांना प्रचंड प्रमाणात पैसा, संपत्ती, दागिने आणि शाही विवाह सोहळे करून देतात. मात्र गरिब आणि मध्यम वर्गीय कुटुंब यामध्ये विनाकारण भरडली जातात. कारण श्रीमंत लोकांमुळे समाजात नको त्या प्रथा रूढ होतात. ते पाहुन मध्यमवर्गीय मुलींच्या सासरचे देखील अवास्तव मागण्या करतात. त्यातून विवाहितेंचा मात्र बळी जातो. तर आजच्या सोशल मिडीयाच्या काळात हे जास्त फोफावत चाललय. कारण प्रत्येकाकडून आपली प्रत्येक गोष्ट सोशल मिडीयावर पोस्ट केली जाते. पण शेवटी ही विचारसरणी आहे. हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीच्या सुखासाठी का दिला असेना. हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गोष्टी चुकीच्याच असल्याचं आपल्या मुला-मुलींना पटवून दिलं पाहिजे. शेवटी प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं शाश्वत असतं अन् अर्थिक आधारावर उभे राहिलेल्या नात्यात भिंती उभ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube