अजित पवारांचा आयपीएस जालिंदर सुपेकरांना फोन; हगवणे प्रकरणावरून दिला ‘हा’ थेट इशारा

Ajit Pawar on Vaishnavi Hagavane Death Case : वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तीने आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे (Hagavane) हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. मात्र, प्रकरण समोर येताच त्याची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत. वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबातील व्यक्तींना ज्याने बंदुक दाखवून धमकावलं त्या निलेश चव्हाण याला जालिंदर सुपेकर यांनीच बंदुकीचा परवाना दिल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालिंदर सुपेकर यांना फोन करून ताकीद दिली आहे. जर हगवणे प्रकरणात सहभाग अढळला तर थेट कारवाई करणार असं ते म्हणाले आहेत.
अंजली दमानियांचा हगवणे कुटुंबासह या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, नक्की प्रकरण काय?
काय म्हणाले अजित पवार?
दरम्यान, वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी सांगितले की, “या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचं नाव माझ्यापर्यंत देखील पोहोचलं आहे. मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललो आहे आणि त्यांना याबद्दल सावध केलं आहे. जर त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले, तर सरकार कोणतीही हयगय न करता कारवाई करेल.