‘…तर रवींद्र वायकर यांनी आत्महत्या केली असती’, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

‘…तर रवींद्र वायकर यांनी आत्महत्या केली असती’, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

अमोल जायभाये, लेट्सअप मराठी प्रतिनिधी

Sanjay Raut Claim Ravindra Waikar would End His Life : लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर (Ravindra Waikar) ईडीने प्रचंड दबाव टाकला होता. या दबावामुळे ईडी (ED) मला अटक करेल, तुरुंगात जाण्यासाठीचे बळ माझ्याकडे नाही. मला अटॅक येऊन मी मरून जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल, अशी निर्वाणीची भाषा वायकर यांनी वापरली होती. त्यांच्यावर अशी भयानक वेळ आल्यामुळेच त्यांना शिवसेना (Shiv Sena) सोडावी लागली, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या आगामी पुस्तकातून केला आहे.

मोठी बातमी! मुकेश अंबानींनी घेतलं 55 बँकांकडून सिंडिकेटेड लोन, आकडा वाचून व्हाल थक्क

खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक 17 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. या पुस्तकांमध्ये संजय राऊत यांनी यासह (Maharashtra Politics) असे अनेक खळबळजनक दावे केले आहेत. राऊत यांना ‘ईडी’ने अटक केली होती. त्यावेळी त्यांना आर्थर रोड कारागृहात शंभर दिवस ठेवण्यात आले होते. या कारागृहातील आठवणींवर आधारित ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले आहे.

वायकर शिंदे गटात गेले, त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक. उद्धव ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटचे ते सदस्य. त्यांचा ‘मातोश्री’वर राबता असे. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह पक्ष सोडला तरीही ते त्यांच्याबरोबर गेले नाहीत. वायकर यांच्या अनेक कौटुंबिक सोहळ्यांत ठाकरे कुटुंबाचा सहभाग असे. जोगेश्वरीत ते ‘सुप्रीमो’ नावाचा क्लब चालवीत. तो क्लब महापालिकेच्या जागेवर होता. तेथे अनेक लग्नसोहळे पार पडत, असेही राऊत यांनी पुस्तकामध्ये नमुद केले आहे.

वेट अँड वॉच! पवार कुटुंब एकत्र येणार? नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आमच्यासोबत येतील…

तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील जमिनींच्या तुकड्यांवर नऊ बंगले बांधले असल्याचे ‘फेक नरेटिव्ह’ पसरवले. हे बंगले ठाकरे कुटुंबाचे आहेत, असे भासवले. खोटे गुन्हे नोंदवले. त्याचबरोबर ‘सुप्रीमो’च्या जमिनीबाबत नोंदी बदलल्याची बोंब ठोकून पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला. पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेत वायकरांचा तपास सुरू केला आणि याच गुन्ह्याचा आधार घेत त्यात ईडीला घुसवले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

‘वायकर यांना ईडी अटक करणार,’ असा धुरळा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली. वायकर आणि त्यांचे कुटुंब ‘मातोश्री’वर येऊन रडले. ‘माझ्यात तुरुंगात जायचे बळ नाही आणि ईडीच्या दहशतवादाशी लढण्याचे धैर्यदेखील नाही,’ असे ते म्हणाले. वायकर हे हार्ट पेशंट असल्याने ‘मला अटॅक येऊन मी मरून जाईल, नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल. तुरुंगात मरण्यापेक्षा बाहेर मरेन,’ अशी निराश आणि निर्वाणीची भाषा त्यांनी सुरू केली, तेव्हा उद्धव ठाकरेही हतबल झाल्याचे राऊत म्हणाले. त्यानंतर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं संजय राऊत यांनी पुस्तकामध्ये म्हटलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube