वेट अँड वॉच! पवार कुटुंब एकत्र येणार? नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आमच्यासोबत येतील…

वेट अँड वॉच! पवार कुटुंब एकत्र येणार? नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आमच्यासोबत येतील…

Neelam Gorhe On Pawar And Thackeray Family Alliance : राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येणार, अशा चर्चा सध्या सुरू आहे. त्याच पाठोपाठ आता ठाकरे बंधू देखील एकत्र येणार यादेखील चर्चा सुरू आहे. पवार कुटुंब एकत्र येण्यावरती आपली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असणार आहे. तसेच जेवढे जास्त लोकं येतील, तेवढे चांगलेच आहे. सुप्रिया ताईंचे देखील स्वागत आहे, असं स्पष्ट वक्तव्य यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केलंय.

राज्याचा राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीय हे चांगले चर्चेत (Maharashtra Politics) आहे. अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र येणार, असे चर्चा सुरू असताना यावरती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील वक्तव्य केले आहे.

नात्यांच्या गाठी, भावना आणि आठवणींचा हळुवार स्पर्श! ‘अमायरा’ चा ट्रेलर प्रदर्शित

यावेळी बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, पवार कुटुंब एकत्र येणार का? (Pawar And Thackeray Family Alliance) यावर वेट अँड वॉच’ची भूमिका असणार आहे. तसेच जेवढे लोक आमच्यासोबत येतील तेवढे चांगलेच आहे. महायुती म्हणून सुप्रियाताईंना देखील शुभेच्छा देतो, पण सोबत येण्याबाबत अजित पवारच काय करायचे ते ठरवतील, असंही गोऱ्हे यांनी म्हटलंय.

यावर भाष्य करणे योग्य नाही, कारण आपल्याला कोणी सल्ला विचारला नाही. तरी आपण यावरती भाष्य करणे योग्य नाही. कारण, आपण दररोज सकाळी नऊ वाजता प्रेसवर भाष्य करणारे नाही आहोत, अशा शब्दात गोऱ्हे यांनी नाव न घेता खास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरती देखील निशाणा साधला आहे.

तर…निवडणुका स्वबळावर, शिवसेनेचा भगवा फडकवणारच! नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य

राजकारणात पवार कुटुंब एकत्र येत आहेत, तसेच यापुढे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? यावरती बोलताना गोऱ्हे म्हटल्या की, यावर मी काही सांगू शकत नाही. कारण एकनाथ शिंदे यांनी जो काही निर्णय घेतला आहे, तो विचारपूर्वक घेतला आहे. यावर काही भाष्य केले तर वाक्याचा विपर्यास होऊ शकतो, यामुळे आपण यावरती काही एक भाष्य करणार नाही, असे देखील यावेळी गोऱ्हे यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube