धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, सुनबाईला दिलं एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन

धक्कादायक!  हुंड्यासाठी छळ, सुनबाईला दिलं एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन

Uttar Pradesh Crime News Dowry Case : हुंड्यासाठी सुनेचा छळ होणं, ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाहीये. देशभरात हुंड्याच्या प्रथेमुळे (Crime News) अनेक महिलांचा छळ होतो. अनेकजणी हा त्रास सहन करतात, तर बऱ्याचजणी टोकाचं पाऊल उचलतात. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आलीय. हुंड्यासाठी (Dowry Case) सुनेला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिल्याचं समोर आलंय. या धक्कादायक घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

रखडलेली कामं अन् व्यवसायात नफा…रविवार या राशीच्या लोकांसाठी ठरणार खास!

हुंडा मागणीची ही लज्जास्पद धक्कादायक हरिद्वारमध्ये घडली. सहारनपूरच्या थाना गंगोह भागातील एका व्यक्तीने 15 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या मुलीचं लग्न हरिद्वारच्या जसवाला येथील रहिवासी अभिषेक उर्फ ​​सचिनशी लावून दिलं होतं. वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नात हुंडा दिला होता. यामध्ये 15 लाख रुपये रोख, व्हेन्यू कार, सोने आणि चांदीचे दागिने यांचा समावेश होता. बँक्वेट हॉलमध्ये लग्न मोठ्या थाटामाटात झालं, हुंड्यासह सुमारे 42लाख रुपये खर्च झाले. लग्नानंतर काही दिवस सुनेला सासरच्या मंडळींनी चांगलं वागवलं. पण, त्यानंतर तिचा नवरा आणि सासरच्या लोकांनी तिच्याकडून जास्त पैशांची मागणी करायला सुरुवात केली.

पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने विवाहित महिलेला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे विवाहित महिला आजारी पडू लागली. तिला साधं त्यांनी डॉक्टरकडेही नेलं नाही. जेव्हा विवाहित महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीला या अवस्थेत पाहिलं अन् तिला डॉक्टरकडे नेले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. तिची चाचणी करण्यात आली, तेव्हा विवाहित महिलेला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याचं समोर आलं. सासरच्यांनी विवाहित महिलेला एचआयव्हीचे इंजेक्शन देऊन तिला एचआयव्हीची लागण केली, असा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर; महाकुंभात जाण्यासाठी झाली होती गर्दी

पीडिता आजारी असल्याने बऱ्याच काळापासून तिच्या माहेरी राहतेय. आता न्यायालयाच्या आदेशावरून पती अभिषेक, मेहुणा विनायक, मेहुणी प्रीती आणि सासू जयंती अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेच्या पालकांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पीडितेच्या आजोबांचे आरोप केलाय, की त्यांच्या मुलीला खूप वाईट वागणूक देण्यात आली आहे. ते त्यांचे दुःख शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पीडितेच्या आजोबांनी सरकार आणि न्यायालयाकडून कठोर कारवाई आणि शिक्षेची मागणी केलीय. लग्न मोठ्या धुमधडाक्यात झालं, पण लग्नानंतर लगेचच जास्त हुंडा आणल्यासाठी तिला त्रास दिला जाऊ लागला. एचआयव्ही पॉझिटिव्ह इंजेक्शन्स देखील देण्यात आलं. यामुळे तिची तब्येत सतत खालावत गेली. आज त्याची नात जीवन आणि मृत्यूची लढाई लढतेय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube