पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवलं

Vaishnavi Hagavane case repeated in Pune; Married woman ends life due to dowry harassment : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यात महिलांच्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यातच हाय प्रोफाईल केस असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यात पुन्हा एका विवाहितेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुण्यातील हडपसर परिसरात दाखलदीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी या 22 वर्षीय विवाहितेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे.दीपा आणि प्रसाद पुजारी यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र काही महिन्यातच विवाहात हुंडा दिला नाही तसेच व्यवस्थित मानपान केला नाही. असे टोमणे मारुन तिचा छळ सुरू करण्यात आला.
विजेचा खेळखंडोबा! बत्ती गुल झाल्याने नगरकर संतापले, थेट अधिकाऱ्यांना….
तर दीपाच्या कुटुंबियांनी तिच्या सासरच्यांना विवाहामध्ये चार तोळे सोने दिले आणि सुमारे १० लाख रुपयांचा मानपान करत मोठ्या थाटामाटात विवाह उरकविला होता.मात्र अखेर पती प्रसाद आणि सासरकडील नातेवाईकांकडून शारिरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याने दीपाने राहत्या घरात सोमवारी (१९ मे) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.
आता फक्त POK वरच चर्चा, हक्काचं पाणी देणार नाही; PM मोदींची तोफ पाकिस्तानवर धडाडली…
त्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचे वडील गुरुसंगप्पा पुजारी पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा पुजारी, सासरे चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.