Rain Alert : विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा…

आज 11 जून रोजी विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

rain update

Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मॉन्सूनच्या (Rain Alert) सरी कोसळत आहेत. तर उर्वरित राज्यात अद्याप मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. आज 11 जून रोजी विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान, उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! तृणमूल पक्षात फूट पाडलेल्या 19 खासदारांची यादी जाहीर

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील श्रीगंगानगर येथे देशातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हंगामी कमी दाबाचा पट्टा पंजाब ते बिहारपर्यंत सक्रिय आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, त्यापासून विदर्भापर्यंत, तसेच कर्नाटक किनाऱ्यापासून ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे.

बुधवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे ४३.५ अंश सेल्सिअस, अकोला, गोंदिया आणि यवतमाळ येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, तर धुळे, जळगाव, अमरावती आणि गडचिरोली येथे ४१ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

आधी प्रेम मग पोक्सो केस आता त्याच्याशीच बांधली लग्नगाठ; सुप्रीम कोर्टनेही वापरला विशेषाधिकार, प्रकरण काय?

आज (ता. ११) विदर्भासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने, तसेच पालघर जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक राहण्याची शक्यता कायम आहे.

मोसमी वाऱ्यांनी बंगालच्या उपसागरावर चाल करत मंगळवारी (ता. ९) संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीम राज्य व्यापले आहे. पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात देखील मॉन्सून दाखल झाला. मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची चाल न झाल्याने सोलापूरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ आहे.

follow us