Maharashtra Election : लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात धक्कादायक निकाल समोर आले. लोकसभेला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने (MVA) राज्यात आघाडी घेतली होती मात्र विधानसभेत महायुतीने (Mahayuti) आघाडीचा सुपडासाफ केला. यातच लोकसभेमध्ये नगर जिल्ह्यात दोन्ही जागेवर आघाडीचे खासदार निवडून आले. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे नगर दक्षिणेत झालेल्या सुजय विखे (Sujay Vikhe) विरुद्ध निलेश लंके (Nilesh Lanke) या लढतीकडे.
लंके यांच्या विजयासाठी नगर जिल्ह्यातील मोठं मोठ्या नेत्यांसह कार्यकर्ते तसेच विधानसभेचे इच्छुक यांनी काम केले व लंकेंना निवडून आणले. याची परतफेड म्हणून विधानसभेत आघाडीचे जे उमेदवार निवडणूक लढले मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एक प्रकारे लंकेंना लोकसभेत मदत करणाऱ्या बहुतांश उमेदवारांना पराभवाच्या स्वरूपात किंमत मोजावी लागली व विखे यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यातील आपले वर्चस्व दाखवून दिले अशा चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत.
नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके सामना झाला. लंके यांनी विखे यांचा पराभव केला व हा विखे कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानला गेला. विखेंना पराभूत करण्यासाठी व लंके यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसह इच्छुक उमेदवारांनी देखील तण मनाने काम केली. याच फलित लंकेंना भेटलं व लंके विजयी झाले त्यांनतर लंकेची एक वेगळीच हवा जिल्ह्यासह राज्यात पाहायला मिळाली.
अनेक मतदार संघामध्ये लंके जोरदार भाषणे करू लागले. नगर जिल्ह्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मंचावरूनच जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघातून आमदार निवडून आणतो अशी ग्वाही पवारांना दिली. लोकसभेत आघाडीला मिळालेलं यश व विखेंना पराभूत करणारे लंके यामुळे विधानसभा आघाडीसाठी अनुकूल राहील असा समज निर्माण झाला. मात्र विधानसभेत नगर जिल्ह्यातून आघाडीचे अक्षरशः सुपडासाफ झाला व शरद पवारांसह लंकेची जादू जिल्ह्यातून घटली असे चित्र पाहावयाला मिळाले.
लोकसभेच्या पराभवाचा विखेंनी घेतला बदला
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी नगर दक्षिणेसह उत्तरेतून लंके यांना नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून मदत मिळाली होती. मात्र झालेल्या पराभवाचा बदल घेण्यासाठी सुजय विखे देखील सज्ज झाले होते. लंकेसाठी मदतीला धावणारे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरे जावे लागले. थोरातांच्या विरोधात नवखे अमोल खताळ यांनी विखेंच्या मदतीने थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. तसेच विखे यांनी पारनेरमध्ये देखील लंकेंना धक्का दिला.
खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना देखील पराभवाची धूळ चाखवली. युतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना पाठबळ देत लंके यांना धोबीपछाड देत दाते यांनी विजयाचा गुलाल उधळला. यामुळे विखे यांनी लोकसभेचा बदला घेत लंकेंना आस्मान दाखवून दिले.
लंकेंना मदत करणे ‘या’ उमेदवारांना भोवले
विधानसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडासाफ झाला. यामध्ये लंके यांना लोकसभेत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना पराभवाला सामोरे लावे लागले. यामध्ये जिल्ह्यातील दक्षिण मधील उमेदवारांची यादी पहिली तर नगर शहरातून आघाडीचे अभिषेक कळमकर यांचा पराभव झाला. पारनेरमधून राणी लंके, श्रीगोंदामध्ये राहुल जगताप, शेवगाव पाथर्डीमध्ये प्रताप ढाकणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले केवळ कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे विजयी झाले तर भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव झाला.
यामध्ये आपण नगर उत्तरेकडे आघाडीच्या उमेदवारांबाबत बोलायचे झाले तर राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे हे पराभूत झाले. तसेच संगमनेरमध्ये दिग्गज नेते बाळासाहेब थोरात, शिर्डी मध्ये प्रभावती घोगरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लंके यांनी आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या जोरदार भाषणे केली, मात्र विखेंनी पाठिंबा दिलेले उमेदवार हे चांगले मताधिक्य घेऊन निवडून आले. यामुळे जिल्ह्यातील लंके यांची क्रेझ कमी करत विखे कुटुंबीयांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद जिल्ह्यात दाखवून दिली.
ठाकरेंनी धोका दिला पण शिंदेंचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा, बावनकुळेंचा हल्लाबोल
विखेंची संयमी खेळी…थोरात – लंके चितपट
निलेश लंके यांनी लोकसभेच्या निकालानंतर विखेंवर जोरदार टीका टिपण्णी करण्यास सुरुवात केली. मात्र, हे सगळं होत असताना विखे पिता- पुत्रांनी लंके त्यांच्या टिकेवर भाष्य केले नाही. विखे हे शांत का बसले आहे हे लंके यांनी समजून घेणे आवश्यक होते. मात्र, एका रात्रीत जिल्ह्याचा नेता झाल्याच्या अविर्भावात लंके यांनी एकाच वेळी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली. मात्र अगदी शांत राहून विखे पिता पुत्रांनी लोकसभेच्या निकालाचा बदला घेत थोरातांसह लंकेंना चितपट केले व दुसरीकडे राज्यासह केंद्रातील भाजपा नेत्यांना नगर जिल्हा कोणाचा हे दाखवून दिले.