Devendra Fadnavis on Chief Minister Post : महाविकास आघाडीत मु्ख्यमंत्रिपदावरून बराच गोंधळ उडाला होता. उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. परंतु, शरद पवार गट आणि काँग्रेसने त्याला फार महत्व दिले नाही. इतकेच काय तर स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील शरद पवारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा असे आव्हान दिले होते. महायुतीत मात्र अशी परिस्थिती समोर आली नाही. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. महायुती विजयी झाल्यास आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणतीही रस्सीखेच होणार नाही अस फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले, आमच्यात अशा प्रकारची कोणतीही आश्वासने दिलेली नाहीत. कारण मुख्यमंत्री निवडण्याची एक पद्धत आमच्याकडे आधीपासूनच अस्तित्वात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह (Eknath Shinde) युतीतील कोणत्याही नेत्याने पदाची मागणी केलेली नाही. जो काही निर्णय होईल तो निष्पक्ष होईल. आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.
देवेंद्र तात्यांनी मला खूप शिकवलं.. विजयाचा फॉर्म्युला सांगत जरांगेंचा फडणवीसांना टोला
यानंतर त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. आमच्या योजनांबाबत बोलताना पैसे कुठून आणणार असा प्रश्न आघाडीच्या नेत्यांनी विचारला होता आणि आता आमच्याच योजनांद्वारे मिळणारा लाभ डबल करण्याबाबत बोलत आहेत. आमच्याकडे केंद्र सरकारचं पाठबळ आहे. पण मोठ मोठी आश्वासनं पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे कुणाचं समर्थन आहे असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काही दिवसांपूर्वी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. यावर विचारले असता फडणवीस म्हणाले, आम्ही विकास आणि आमच्या कल्याणकारी योजनांना केंद्रस्थानी ठेवणार आहोत. पण बटेंगे तो कटेंगे म्हणण्यात काहीच चुकीचं नाही. कारण एक दुभंगलेला समाज नेहमीच विनाशाला सामोरे जात असतो.
Devendra Fadnavis : विधानसभेनंतर सर्वात मोठा पक्ष कोणता?, फडणवीसांनी थेट आकडेच सांगितले