Download App

14 फेऱ्यांमध्ये अमोल खताळच जोमात; बाळासाहेब थोरात अद्यापही पिछाडीवरच…

संगमनेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ आघाडीवर असून महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत.

Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवारांना यश मिळाल्याचं चित्र दिसून येतंय. तर अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दिग्गज उमेदवारांना धक्का बसल्याचं पाहायला मिळतयं. राज्यातील काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ अद्यापही आघाडीवरच असल्याचं दिसून येत आहे. 14 व्या फेरीअखेर खताळ 10064 मतांनी आघाडीवर असून खताळ यांना 77403 तर महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांना 67339 मते मिळाली आहेत.

कोपरी पाचपाखडीत एकनाथ शिंदे पुढे, केदार दिघेंना चौथ्या फेरीत किती मतं मिळाली?

अकराव्या फेरीअखेरीसही बाळासाहेब थोरात पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. अकराव्या फेरीअखेरीस थोरात यांना 5395 मते मिळाली असून बाळासाहेब थोरात यांना 7443 मते मिळाली आहेत. अकराव्या फेरीत खताळ यांनी 5395 मतांनी आघाडी घेतली होती.

follow us