मुंबई : राजधानी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर आज (दि.29) मुंबईत महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आल्या होत्या. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार नियोजित दोन्ही बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मुळ गावी मार्गस्थ झाल्याचेही सांगितले जात आहे. (Mahayuti Meeting Cancel)
पवारांच्या खास शिलेदाराकडून सुजय विखेंचा लोकसभेतील प्लॅन रिपीट; फेरमतमोजणीसाठी मोजले लाखो रूपये
शाहंच्या फोननंतर सूत्र फिरणार
मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (दि.28) रात्री दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली असून, महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी ही बैठकी कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली आहे याबाबत कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. मात्र, दोन दिवसानंतर अमित शाहंचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीसांवरील बदला घेण्याचा ठपका पुसून निघेल; पण त्यांचा स्वभाव…; काँग्रेस नेत्याच्या विधानाची चर्चा
गटनेता निवडीनंतर होणार बैठक
मुंबईत आज महायुतीच्या बैठकीशिवाय शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठकही पुढे ढकलण्यात आली असून, पुढील दोन दिवस महायुतीची बैठक होणार नसल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत असन, दोन दिवस बैठका होणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगाव देरे गावाकडे मार्गस्थ झाले असून, शाहंच्या फोन नंतर ते बैठकीसाठी मुंबईत परततील अशी चर्चा आहे.
महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळेल का? वाचा, काय सांगतो नियम..
शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी ठेवले मोठे प्रस्ताव
दिल्लीत अमित शाहंची बैठक होण्यापूर्वी तिन्ही नेत्यांची बैठक (Maharashtra Politics) झाली. सुमारे 20 मिनिट ही बैठक चालली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी काही प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर ठेवले आहेत. शिवसेनेला जर मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर सध्या असलेल्या खात्यांपैकी पाच वजनदार खाती शिवसेनेला मिळाली पाहिजे. उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असेल तर अर्थ किंवा गृहपैकी एक पद मिळावी, अशी एकनाथ शिंदे यांनी अपेक्षा व्यक्त केलीय.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: शुभेच्छा द्यायला जाईल; रोहित पवारांनी घेतली फिरकी
शिंदेंनी पक्षाकडून 12 मंत्रिपदांचीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी केली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह मपालकमंत्री पद देताना पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना विनंती केली असून, दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला होता. खरं तर भाजपश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय मान्य असेल, असं देखील शिंदे म्हणाले होते.