Download App

विधानसभेसाठी मविआचा अधिकृत फॉर्म्युला ठरला; पत्रकार परिषदेत घोषणा

MVA Seat Sharing Formula Fix : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीचा (MVA) अधिकृत फॉर्म्युला ठरला आहे. आज महाविकास आघाडीच्या

  • Written By: Last Updated:

MVA Seat Sharing Formula Fix : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीचा (MVA) अधिकृत फॉर्म्युला ठरला आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) , काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांची शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बैठक पार पडली असून त्यांनी जागावाटप जाहीर करण्याचे आदेश दिले. माविआचं जागावाटप सुरळीतपणे पार पडलं आहे. असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमचं जागावाटप समाजवादी पार्टी, शेकाप यांंना सामावून घेणारं असेल. सध्या 85-85-85 असं एकूण 255 जागांवर यादी बनवलेली आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु होईल. या प्रकारे 288 जागा मविआ पूर्ण ताकदीनं लढेल असं देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली असून 85-85-85 या जागांवर मिळून एकूण 255 जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु असून उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल.आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहे आणि राज्यात मविआचं सरकार येणार असं नाना पटोले म्हणाले.

तर दुसरीकडे आज शिवसेनेकडून (ठाकरे गट) 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) देखल एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. तसेच काँग्रेसकडून देखील आपल्या उमेदवारांची यादी तयार झाली असून आज किंवा उद्या काँग्रेसकडून यादी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Rajarani : अखेर “राजाराणी” चित्रपटासाठी वकील वाजीद खान यांचा माफीनामा 

तर महायुतीकडून देखील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. भाजपने 99, अजित पवार गट 38 आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

follow us