Download App

Rajarani : अखेर “राजाराणी” चित्रपटासाठी वकील वाजीद खान यांचा माफीनामा

Rajarani : संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबरपासून प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांन कडून भरभरून प्रतिसाद मिळत असलेला 'राजाराणी' (Rajarani) हा

  • Written By: Last Updated:

Rajarani : संपूर्ण महाराष्ट्रात 18 ऑक्टोबरपासून प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांन कडून भरभरून प्रतिसाद मिळत असलेला ‘राजाराणी’ (Rajarani) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ह्या चित्रपटात बिग बॉस जिंकून आलेला सुरज चव्हाण (Suraj Chavan) मुख्य भूमिकेत आहे. ‘राजाराणी’ हा चित्रपट पहिल्या पासूनच चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर हा चित्रपट मुला मुलींना आत्महत्या करायला भाग पाडत आहे म्हणून हा चित्रपट बंद करावा अशी सुप्रसिद्ध वकील वाजीद खान यांनी मागणी केली होती.

यावेळी त्यांच्या मागणीवर प्रेक्षकांनी वकील वाजीद खान यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती व सुरज चव्हाण च्या चाहत्यांनी सोशल मीडिया मध्ये ‘आय सपोर्ट सुरज चव्हाण आणि आय सपोर्ट राजाराणी चित्रपट’ असा मोठ्या पद्धतीने पाठिंबा जाहीर केला होता. यावेळी निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी वकील वाजीद खान यांना विनंती केली की एकदा व्यवस्थित चित्रपट पहा आणि आपलं मत कळवा.

यावेळी वकील वाजीद खान यांनी चित्रपट पाहून निर्माते यांना फोन करून आपण चर्चा करून पत्रकार परिषद घेऊ अशी विनंती केली. आज पुणे येथे वकील वाजीद खान आणि राजाराणी चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे , दिग्दर्शक शिवाजी दोलताडे , प्रमुख अभिनेते रोहन पाटील यांनी पत्रकार भवन येथे एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी वकील वाजीद खान यांनी “राजाराणी” चित्रपटाचा अभिनेता सुरज चव्हाण व संपूर्ण चित्रपटाच्या टीम ची जाहीर माफी मागितली व माझ्या कडून गैरसमजातून व पूर्ण माहिती न घेता हे वक्तव्य करण्यात आलं अजून ज्यांची मन दुखावले असतील त्या सर्वांची माफी मागतो अस देखील वकील वाजीद खान यांनी सांगितले.

आमचा चित्रपट खरा आहे व आम्ही अतिशय जबाबदारी पूर्वक आणि अतिशय गरीब परिस्थिती मधून हा चित्रपट बनवला आहे असं चित्रपटाचे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले व आमचा चित्रपट लोक स्वीकारत आहेत व प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे व लोक चित्रपटाला न्याय देत असे देखील निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले.

Uddhav Thackeray : विधानसभेसाठी ठाकरेही तयार, ‘या’ उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप

आमचा चित्रपट सत्य आहे आणि सत्य एक दिवस जिंकत आणि ‘राजाराणी’ चित्रपट हा सुपरहिट होणाच्या मार्गावर आहे असं यावेळी दिग्दर्शित शिवाजी दोलताडे म्हणाले. सुरज चव्हाण आणि आमच्यावर झालेला हा अन्याय पुसून निघालेला आहे , “राजाराणी” चित्रपट लोकांना आवडत आहे आणि लोक ‘राजाराणी’ ला सुपरहिट करणार अस यावेळी अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितले.

follow us