सूरज चव्हाणला पक्षात कायमची नो एन्ट्री; तर, कोकाटेंचा मंगळवारी करेक्ट कार्यक्रम; अजितदादांचा शब्द

सूरज चव्हाणला पक्षात कायमची नो एन्ट्री; तर, कोकाटेंचा मंगळवारी करेक्ट कार्यक्रम; अजितदादांचा शब्द

Suraj Chavan never accepted in party, Kokate’s resignation by Tuesday; Ghadge’s meeting and Ajit Pawar’s words : लातूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये छावा संघटनेच्या विजय घाडगेंना मारहाण करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता घाडगे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले विजय घाडगे?

अजित पवार यांच्यासोबचतच्या भेटीमध्ये काय झालं? हे सांगताना घाडगे म्हणाले की, जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं असं दादांनी म्हटलं, महाराष्ट्रातील राजकारणात अस व्हायला नाही पाहिजे. आरोपीवर किरकोळ गुन्हे दाखल केले, सोडून दिले, यावर अजित पवारांनी लातूर पोलिसांशी बोलले, हे खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. मी लातूर ला जाऊन SP ना भेटणार आहे. का मारलं? अस दादांना थेट विचारलं, आमचं काय चुकलं? त्यावर ते म्हणाले की, घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. ‘त्या’ व्यक्तीला पुन्हा पक्षात घेणार नाही असं दादांनी सांगितलं.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, EPFO मध्ये मोठा बदल, नॉमिनीला मिळणार 50,000 रुपये

तर कोकाटेंच्या राजीनाम्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना मंत्री पदावरून हाकलून द्या अस म्हटलं आहे.माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करून, मंगळवार पर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. दोन दिवसांची वेळ अजित पवारांनी मागितली आहे.

पीक विमा योजनेत फारसं पीक हाती येत नाही; मुदतवाढ मिळूनही पीक विमा भरण्याकडं शेतकरी फिरकेना

तसेच यावेळी घाडगे यांनी अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही अजित पवारांच्या दारात आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube