Download App

मारकडवाडीच्या ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न हा संविधानाचा खूनच, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole : विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम (EVM) व

  • Written By: Last Updated:

Nana Patole : विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम (EVM) व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (Markadwadi) ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदान करु दिले नाही.

मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करु दिले नाही का?, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागले, त्यामुळे ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते, पण भाजपा सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली.

मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही व संविधानाचा खून आहे. विधानसभा निवडणुक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. काँग्रेस पक्षानेही सातत्याने निवडणुकीतील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या पण निवडणूक आयोग ‘कुंभकर्णी’ झोपेतून जागे झाले नाही. निवडणूक आयोग आता फक्त नावालाच स्वायत्त संस्था उरली असून आज ते भाजपाच्या हाताखालचे कठपुतली बाहुले झाले आहे का? असा प्रश्न जनता विचारत आहे.

मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष या लढाईत मारकडवाडीच्या ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन हुकूमशाही हरेल व लोकशाहीचाच विजय होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

तर दुसरीकडे काहीवेळा त्यांनी या प्रकरणात ट्विट देखील केला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मारकडवाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाला सलाम! विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका आहे. आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी सोलापूरच्या मारकडवाडी ग्रामस्थांनी आज (मंगळवार, 3 डिसेंबर) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करून, पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखले.

मारकडवाडीमध्ये प्रशासन ब्रिटिशांप्रमाणे वागत आहे. त्यामुळे EVM आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर प्रशासन एका छोट्या खेड्यात मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला का घाबरत आहे? आपले बिंग फुटेल म्हणून? EVM वरचे मतदान निर्दोष आहे, त्यात काही घोटाळा नाही हे जनतेला पटवून देण्याची संधी प्रशासनाने भाजपच्या दबावामुळे गमावली आहे. त्याचवेळी मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी लोकशाहीच्या रक्षणार्थ एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली. काँग्रेस पक्ष या लढाईत ग्रामस्थांसोबत आहे. या लढ्याचे आगामी काळात मोठ्या युद्धात रुपांतर होऊन लोकशाहीचा विजय होईल. डरो मत!

भाजपकडून सत्तेची खेळी, दाल में कुछ काला है… अंजली दमनिया यांचा गंभीर आरोप

प्रकरण काय

मारकडवाडी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांना मताधिक्य मिळत होते मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना या गावातून मताधिक्य मिळाल्याने उत्तम जानकर यांनी स्वखर्चाने गावात बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या मतदानप्रक्रियाला पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

follow us