भाजपकडून सत्तेची खेळी, दाल में कुछ काला है… अंजली दमनिया यांचा गंभीर आरोप
Eknath Shinde Opposition Leader Mahayuti Government : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीकडे बहुमत असून भाजप (BJP) सर्वात जास्त जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्या देखील जागा नाहीत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांची सोशल मिडिया X अकाउंटवर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत (Mahayuti Government) आलीय. त्यांनी भाजपचा विरोधी पक्ष (Opposition Leader)संपवण्याचा कट असल्याचा दावा केलाय.
अंजली दमनिया (Anjali Damania) त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटल्या आहेत की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते. चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले. मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है. ते पत्रकार मला म्हणाले की, भाजपचीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावे. त्यांना हवे नको ते सगळे पुरवले जाईल, विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच. बाकी सगळे साफ, तसेच होतांना दिसतंय.
अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
महायुतीच्या नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी अचानक भूमिका बदलल्याच्या चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख विरोधी पक्षांतील नेतृत्वावर गंभीर शंका व्यक्त केली जातेय. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या नव्या राजकीय खेळीवर नवा वाद निर्माण झालाय. अंजली दमानिया यांनी सोशल मिडिया हँडल एक्सवर पोस्ट करत भाजपवर आरोप केलाय.
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते?
परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते.
४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले,
दाल मे कूछ काला है.
ते पत्रकार मला म्हणाले की भाजप…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2024
शिंदे अलर्ट मोडवर, पवार दिल्लीला तर शाह चंदिगढला रवाना; महायुतीत नेमकं चाललंय काय?
अंजली दमानिया यांनी भाजपवर आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय की, “भाजपने सत्तेची खेळी करत केवळ सत्ताच राखली नाही, तर विरोधी पक्ष देखील आपलाच ठरवला आहे. भाजपची विरोधी पक्षांना नष्ट करण्याची रणनिती आहे. त्यांना इतर पक्ष अन् विरोधी पक्ष नेतातच अस्तित्वात ठेवायचे नाहीत.” यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्या कारणाने भाजप विरोधीपक्ष नेतेपदी आपलाच माणूस बसवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास पुन्हा महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष पाहता येणाऱ्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.