Download App

… तेव्हा वर्षा बंगल्यावर एंट्री नव्हती, योगेश कदमांचा ठाकरेंबद्दल मोठा खुलासा

Yogesh Kadam : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे.

  • Written By: Last Updated:

Yogesh Kadam : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे. कोणी जाहीर सभा घेत आहे तर कोणी मुलाखती देत आहे. यातच खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी लेट्सअप मराठीशी (Letsup Marathi) बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सहानुभूती मिळणार नाही. या मतदारसंघात सर्व शिवसैनिक माझ्याच सोबत आहे. असा दावा देखील त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला.

लेट्सअप मराठीशी बोलताना महायुतीचे उमेदवार योगेश कदम म्हणाले की, महायुतीकडून मला उमेदवारी मिळेल याचा विश्वास होता. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीनंतर कामाला लागलो. गेल्या पाच वर्ष आमदार म्हणून मी जनतेच्या संपर्कात होतो. त्यामुळे या निवडणुकीत विजय आमचा होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना दिली.

तसेच जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उठाव केला तेव्हा जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्यासाठी सहानुभूती होती मात्र आता त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही. उठावानंतर सुरुवातीच्या काळात आम्हाला याचा फटका देखील बसला मात्र हळूहळू जनतेला कळू लागला की आम्ही हा निर्णय का घेतला. जेव्हा हे जनतेला कळले तेव्हापासून जनता आमच्यासोबत आहे. जेव्हा मी उठाव केला तेव्हापासून आतापर्यंत एकही शाखा प्रमुख उबाठामध्ये गेला नाही. सगळे शाखा प्रमुख माझ्यासोबत आहे. म्हणजेच शिवसैनिकांनी माझी भुमिका स्वीकारली. असं योगेश कदम म्हणाले.

वर्षा बंगल्यावर अपाॅईनमेंट शिवाय आमदारांना, खासदारांना, नेत्यांना प्रवेश नव्हता

उद्धव ठाकरे यांच्या काळात कोरोना महामारी होती. शेवटी वाईट गोष्टींमधून चांगली गोष्टी घडतात. जेव्हा एकदा संकट येतो तेव्हा त्या संकटातून राजकीय फायदा कसा घेता येईल, त्या संकटातून आपण मार्ग कसा काढला पाहिजे हे प्रमुखाचा काम आहे. त्यावेळी विकासकामे ठप्प होती. आमच्या गाठीभेटी मुख्यमंत्र्यांसोबत होत नव्हते. वर्षा बंगल्यावर अपाॅईनमेंट शिवाय आमदारांना, खासदारांना, नेत्यांना प्रवेश नव्हता. मात्र जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्याच दिवसापासून वर्षा बंगल्यावर आम्हाला प्रवेश मिळत होता. तसेच ते आमचे फोन देखील उचलतात आणि जेव्हा फोन उचलला नाही तर ते कॉलबॅक देखील करत असतात. असं देखील ते म्हणाले.

शिंदे साहेबांनी प्रचंड निधी दिला

खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघात विकास कामासाठी शिंदे साहेबांनी प्रचंड निधी दिला आहे. त्यामुळे ह्या अडीच वर्षात आम्ही दुप्पट विकास केला असं देखील योगेश कदम म्हणाले. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही मतदारसंघात 2 हजार 241 कोटी रुपयांचा निधी आणला तर काही कामासाठी निधी अंतिम टप्प्यात आहे. पुन्हा सरकार आल्यावर आम्ही आणखी हजार कोटी रुपयांचे निधी आणणार आहे. असं देखील ते म्हणाले.

फेक नॅरेटिव्हमुळे फटका

लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह आणि संविधानाच्या मुद्यामुळे आम्हाला फटका बसला. तसेच मुंबईकरांनी आमच्या मतदाराला हवे तसे उतरले नाही त्यामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला असेही ते म्हणाले. मात्र विधानसभा निवडणुकीत असा होणार नाही असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल

तसेच मी मुस्लिम आणि कुणबी समाजासाठी अनेक विकास कामे केली आहे. त्यांना देखील विकास हवे आहे आणि ते विकास कामासाठी महायुतीसोबत राहणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना व्यक्त केला.

follow us