Anuradha Nagwade : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवार अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी श्री. संत शेख महंमद महाराज मंदिर पटांगण येथे जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सभा गाजवली. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) देखील उपस्थित होते.
या सभेत बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या की, महाराष्ट्रासह श्रीगोंदामध्ये देखील वेगळा राजकारण पाहायला मिळत आहे. माझे सासरे शिवाजीबापू नागवडे यांनी श्रीगोंदेतील प्रत्येक माणसाला स्वतःच्या कुटुंबासारखे जपले. मात्र आज जेव्हा नागवडे परिवारावर वेळ आली तर समोरचे कसे वागत आहे. हे तुम्ही पाहत आहे. असं या सभेत बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या.
पुढे बोलताना अनुराधा नागवडे म्हणाल्या की, तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचे आहे की, नागवडे परिवारात जी दानत आहे ती यांच्यात कुणातच नाही अशी टीका अनुराधा नागवडे यांनी या सभेत बोलताना विरोधकांवर केली. तसेच आपण यांना दोन दोन वेळा आमदारकीला मदत केली मात्र त्यांना आपल्याला पाठिंबा देता आलं नाही. असं म्हणत त्यांनी राहुल जगताप यांना टोला लावला.
तसेच घनःश्याम शेलार यांनी आपल्या पाठिंबा दिला मी त्यांचे आभार मानते. घनःश्याम शेलार यांचा आम्ही जो मानसम्मान केला आणि करणार आहोत तेच मानसम्मान आम्ही अपक्ष उमेदवार यांचा देखील केला असता पण त्यांच्यात तेवढी दानत नव्हती. असं देखील अनुराधा नागवडे म्हणाल्या. तसेच ज्या माणसावर आपण उपकार केले नव्हते पण त्यांच्या वडिलांनी शब्द दिला होता म्हणून साजन भैय्यांनी उमेदवारी देत मनाचा मोठेपणा दाखवला. असं अनुराधा नागवडे म्हणाल्या.
तसेच विरोधक सांगत आहे श्रीगोंदा तालुक्यात भरपूर निधी आला आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला मात्र तो विकास अनुराधा नागवडे यांना दिसत नाही. पण या मैदानाच्या शेजारीच पोलीस दलाचा हेडकॉटर आहे पहा त्याची काय अवस्था आहे मग 40 वर्ष तुम्ही हे विकास केला का? तालुक्याचा विकास झाला नाही. ज्या ठिकाणाचा राजा व्यापारी असतो तिथली प्रजा भिकारी करून सोडतो अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
आयुष्मान खुराना अमेरिकेच्या म्युझिक टूरसाठी रवाना, शिकागो, न्यूयॉर्कसह ‘या’ शहरात करणार धमाका
तसेच माझ्या विरोधात एक भाजपचे अधिकृत उमेदवार आहे आणि एक भाजपचे अनधिकृत उमेदवार आहे आणि दोन्ही मिळवून श्रीगोंदाची वाट लावत आहे. असा टोला त्यांनी विरोधकांना लावला.