Download App

पृथ्वीराज चव्हाण इतके मोठे आहेत की राहुल गांधी त्यांचे नाव घेत नाहीत, डॉ. अतुलबाबा भोसलेंचा घणाघात

Atulbaba Bhosale : कराड दक्षिणमधील माता-भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, जनतेच्या हक्कांसाठी आणि कराड दक्षिणच्या शाश्वत

  • Written By: Last Updated:

Atulbaba Bhosale : कराड दक्षिणमधील माता-भगिनींच्या कल्याणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, जनतेच्या हक्कांसाठी आणि कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी काम करण्याची मला संधी द्या. तुमचा सेवक म्हणून काम करण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजप – महायुतीचे (Mahayuti) कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Dr. Atulbaba Bhosale) यांनी दिली. काले (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

भाजप– महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ काले येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, गणपतराव हुलवान, सुलोचना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधी हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनी खरंतर अनेक ठिकाणी फिरुन तिथे त्यांच्या पक्षाचे आमदार निवडून आणायला हवे होते. पण ते कुठेही गेलेले नाहीत. ते इतके मोठे आहेत की राहुल गांधी त्यांचे नाव घेत नाहीत की प्रियांका गांधी त्यांच्या सभेला येत नाहीत. गेले 20-25 दिवस तुम्ही कराड दक्षिणसाठी काय भरीव योगदान दिले याबद्दल विचारतोय, पण त्याबद्दल ते एकही ठोस उत्तर देऊ शकलेले नाहीत. गेल्या 5 वर्षांत ते मतदारसंघातील गावांमध्ये गेलेले नाहीत. कार्यकर्ते व मतदारांनाही ओळखत नाहीत. याउलट गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात मोठा विकासनिधी आणता आला, याचे मला समाधान आहे.

या निधीतून रस्ते, पूल, पाणंद रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत. अनेक विकासकामे सुरु असून, बरीचशी पूर्णत्वास गेली आहेत. आपल्या भागात रोजगार निर्मितीसाठी मोठमोठे औद्योगिक प्रकल्प कराडला आणण्याचा माझा मनोदय आहे. यासाठी या निवडणुकीत मला एक संधी द्यावी, असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी सरकारने महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी असंख्य योजना आणल्या. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारनेदेखील जनकल्याणाच्या अनेक योजना साकारल्या ज्याचा लाभ कराड दक्षिणमधील लोकांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. अतुलबाबांना भरघोस मताधिक्य देऊन, त्यांना विजयी करावे. असं सुरेश भोसले म्हणाले.

गेल्या 20  वर्षांपासून तरुणांना संधी द्यायला पाहिजे, असे म्हणणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी तरुणाला संधी द्यायचे सोडून स्वत:च उमेदवारीचे तिकीट घेतले आहे. त्यांनी तरुणांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. जनतेने आता त्यांना घरी बसवायचा निर्णय घेत, कराड दक्षिणच्या प्रगतीसाठी डॉ. अतुलबाबांना भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केले आहे.

सामान्य कुटुंबाच्या आर्थिक विकास साधण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करणार, आशुतोष काळेंची कोपरगावकरांना ग्वाही

यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाच्यावतीने डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. कार्यक्रमाला सुहास जगताप, दादा शिंगण, शिवाजीराव थोरात, आत्माराव तांदळे, ॲड. दीपक थोरात, माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय निकम यांच्यासह कार्यकर्ते, मतदार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

follow us