दलित महासंघाच्यावतीने डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा, पाठिंब्याची कारणही सांगितली
Dalit Federation supports Atulbaba Bhosale : दलित महासंघ ही प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आणि फुले, शाहू आंबेडकर, अण्णा भाऊ यांच्या विचाराने जाणारी संघटना आहे. (Dalit Federation) गेल्या 33 वर्षापासून ही संघटना महाराष्ट्रात कार्यरत असून मातंग समाज आणि इतर दलित भटका विमुक्त समाज हा या संघटनेचा जनाधार आहे त्यांनी डॉ. अतुलबाबा भोसले यांना पाठिंबा दिला आहे.
गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ज्या पद्धतीने मातंग समाज आणि एकूणच दलित समाजाच्या अनुषंगाने कार्य केले आहे. ते इतके महत्त्वपूर्ण आणि लक्षणीय आहे की, ज्यामुळे आम्ही दलित महासंघाचा महायुती आणि महायुती घटक पक्षातील सर्व उमेदवारांना आमचा पाठिंबा जाहीर करीत आहोत असंही ते म्हणाले.
काँग्रेसचे दलित कार्ड : विधान परिषदेला पराभूत झालेल्या चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी
दलित महासंघ महायुतीला पाठिंबा देण्याचं काय कारण आहे यावरही त्यांनी मांडणी केली आहे.
१. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिन” म्हणून जाहीर करण्यात आला.
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करून तेथे “शिक्षाभूमी” स्मारक उभारण्यात आले.
3. मास्को, रशिया येथे अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते उभा करण्यात आला.
4. अण्णा भाऊ साठे यांचे चिराग नगर (मुंबई) येथे 305 कोटी रुपयांचे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
5. वाटेगाव येथील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले.
6. पुणे येथे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे 120 कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि कामास प्रारंभ.
7. अण्णा भाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मुम्बई (आर्टी) ची स्थापना.
8. अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणास गती देण्याच्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश मा. बदर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना केली.
9. जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यामुळे खऱ्या अर्थाने प्रथमच भारतीय संविधानाची अंमलबजावणी जम्मू कश्मीरमध्ये झाली.
एकूणच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार यांनी मातंग समाजाबरोबरच दलितांचे अनेक वर्षाचे अस्मितेचे प्रश्न सोडवल्यामुळे दलित महासंघाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये दलित महासंघाचे कार्यकर्ते सहभागी होतील आणि आपल्या विजया मध्ये आपला वाटा उचलतील, अशी मला खात्री आहे असंही ते म्हणाले.