Download App

मुख्यमंत्र्यांची पदावर राहायची लायकी आहे का? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी तनपुरे भडकले

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहायची लायकी आहे का? या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले आहेत.

Prajakt Tanpure News : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहायची लायकी आहे का? या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) भडकले आहेत. राहुरी तालुक्यातील वळण, वळण-प्रिंप्री, चंडकापुर गावात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना तनपुरेंनी शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढवलायं.

‘मी देखील भाजपसोबत जाऊ शकलो असतो पण…’, उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल

तनपुरे म्हणाले, महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या पातळ्या ओलांडल्या असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातसुद्धा पैसे खाल्ले म्हणूनच पुतळा सहा महिन्यांतच जमीनदोस्त झाला. हिंदुत्व शिकवणारे मुख्यमंत्री वाऱ्यामुळे पुतळा पडल्याचं बेजबाबदार उत्तर देत आहेत, अशा मुख्यमंत्र्यांची पदावर राहायची लायकी तरी आहे का? असा थेट सवाल तनपुरे यांनी केलायं.

तसेच स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला सक्षमीकरण म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, बदलापूर येथे शाळकरी मुलीवर शाळेत अत्याचार झाला. त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब करण्यात आला. पोलिसांनी अत्यंत हलगर्जीपणा केलायं, महिलांवरील अत्याचाराबाबत या राज्यामध्ये सरकार जर सक्षम नसेल तर गृहमंत्री यांची देखील पदावर रहायची लायकी आहे का? असा थेट सवाल तनपुरेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलायं.

नंदूरबारमध्ये भाजपला धक्का! माजी खासदार हिना गावितांचा पक्षाला रामराम; अपक्ष निवडणूक लढणार

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीवर अंवलंबून असून महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आपण शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मतदार संघात दिवसा वीज मिळावी म्हणून प्रकल्प उभे केले. शेतकऱ्यांना मागेल त्याला ट्रांसफार्मर दिले. मतदार शेकडो कोटी रूपयांची विकासकामे केली. आपल्या तालुक्यातील स्थानिक आमदारच आपल्या गरजा ओळखु शकतो, म्हणून अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात जागतीने विकास कामे केली त्याच्या दुप्पट गतीने आगामी काळात आपण विकास काम करु, असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी गणेश भोसले, सुरेश मकासरे, बाळासाहेब खुळे, बाळासाहेब शिंदे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, उमेश खिलारी, प्रकाश आढाव, बी.आर.खुळे, देवानंद मकासरे, वसंत कार्ले, रमन खुळे, बाबासाहेब आढाव, मुकुंदा काळे, रघुनाथ खिलारी, सिताराम गोसावी, भानाभाऊ खुळे, जैन्युदिन शेख, प्रकाश आढाव, विलास आढाव, पिराजी वाघमारे, रोहिदास रंधे, अदिनाथ गडाख,कैलास देशमुख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us