प्राजक्त तनपुरे आक्रमक; सरकारला जागे करण्यासाठी घालणार ‘जागरण गोंधळ’

प्राजक्त तनपुरे आक्रमक; सरकारला जागे करण्यासाठी घालणार ‘जागरण गोंधळ’

Prajakt Tanpure : राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कामाना तसेच तलाठी कार्यालयाच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या नाहीत. या कामांना अद्यापही वर्क ऑर्डर देण्यात न आल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (१७ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर “जागरण गोंधळ” व धरणे” आंदोलन करण्यात येणार आहे.

मागील महिन्यात ८ सप्टेंबरला राहुरी-मांजरी रस्त्यावर राहुरी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांना तसेच तलाठी कार्यालयांच्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात विलंब होतोय. याचा निषेध म्हणून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव येथे रस्त्या रोको आंदोलन केेले होते.

समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी

त्यावेळी तहसीलदार ह्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान ग्रामसडक विभागाचे उपभियंता एस जी गायकवाड यांनी सदर कामे १७ सप्टेंबरपर्यंत सुरु करू असे सांगितले होते. त्यास एक महिना होऊनही या कामाना वर्क ऑर्डर प्राप्त न झाल्याने राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन व जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube