Rajendra Shingane joins NCP Sharad Pawar Group : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला एकामागून धक्के दिले जात आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून एक-एक नेता आता पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP) घरवापसी करत आहेत. आता अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे ( Rajendra Shingane) यांनी घरवापसी केली आहे.
सुप्यात फक्त गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे…; अजितदादांचा निलेश लंकेंवर निशाणा
राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. परंतु आता मुंबईत शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते राजेंद्र शिंगणे यांचा पक्षप्रवेश झाला. वेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
हिरामण खोसकर विरोधकांना निवडणुकीत धडा शिकवणार; अजित पवार त्र्यंबकेश्वरच्या सभेतून कडाडले
पुन्हा घरवापसी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजेंद्र शिंगणे म्हणाले, मी शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल ते काम करण्यास तयार आहे. जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळे मी अजित पवार यांच्या बरोबर गेलो होतो. पण आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने वाचवण्याची गरज आहे. पवार साहेबच हे काम करू शकतात यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर गेलो आहे. अजित पवार गटाकडून तुम्हाला तिकीट मिळणार नव्हते, म्हणून तुम्ही शरद पवार यांच्याकडे गेला असल्याचे बोलले जात असल्याची शक्यता शिंगणे यांना फेटाळून लावला आहे.
तर पुतणी अपक्ष उमेदवारी करणार
शिंगणे यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटात असलेली त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काका राजेंद्र शिंगणे यांच्या शरद पवार गटात प्रवेशाचे मला माहिती नव्हते. मला पवारसाहेबांना एकच विचारायचे आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर एकनिष्ठांना संधी देणार असे ते म्हणत होते. आता ती एकनिष्ठाता कुठे गेली आहे. मी पक्षासाठी काम केले. पक्ष चिन्ह तुतारी मतदारांपर्यंत पोहचविले आहे. तरी त्यांना पक्षात का घेण्यात आहे. मी अपक्ष निवडणूक लढणार आहे, असा मनसुबाही गायत्री शिंगणे यांनी व्यक्त केलाय.