Rani Lanke : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना मोठा धक्का देत बाजी मारली. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCPSP) उमेदवार राणी लंके (Rani Lanke) यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील 18 बुथवरील ईव्हिएम (EVM) मशिनमधील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. राणी लंके यांच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे गुरूवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या पडताळणीसाठी त्यांनी 47 हजार 600 रूपयांप्रमाणे 18 बुथसाठी आवष्यक असलेले 8 लाख 49 हजार 600 रूपये इतके शुल्क शासनाच्या कोषागारात जमा केले आहे.
निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत ईव्हीएम पडताळणी करण्याची मागणी करता येते. आयोगाकडून निकालानंतर 45 दिवसांनी ही पडताळणी करण्यात येत.
पारनेर-नगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या लढतीमध्ये काशिनाथ दाते यांनी अल्पशा मतांनी बाजी मारली. तर दुसरीकडे मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हीएम मशीन संदर्भात शंका घेण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती खा. नीलेश लंके यांनी दिली. तसेच पोस्टल मतदानाचा जो कल असतो तोच कल मतदान यंत्रातील मतांमध्येही असतो असा अनुभव असताना यंदाच्या निवडणूकीत हा कल कसा बदलला गेला असा मुद्दा दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना नीलेश लंके यांनी उपस्थित केला.
… तर माझा लीड 25 हजार असता, लंकेंवर काशिनाथ दातेंचा खळबळजनक आरोप
या बुथवरील मतांची होणार पडताळणी
क्र.2 नागापुरवाडी, क्र. 28 वनकुटे, क्र.30 पठारवाडी, क्र. 38 देहरे, क्र.50 सुतारवाडी, क्र. 92 भाळवणी, क्र.94 भाळवणी, क्र.95 भाळवणी, क्र.114 वडगांव गुप्ता, क्र.115 निंबळक, क्र.117 निंबळक, क्र.265 सुपा, क्र. 267 सुपा, क्र.268 सुपा, क्र.293 वाळवणे, क्र. 310 निघोज, क्र 313 , निघोज, क्र. 359 वाडेगव्हाण.