Download App

शरद पवारांचं माढ्यात वेगळंच राजकारण; साखर कारखानदार अभिजित पाटील यांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शरद पवार यांच्या व्यासपीठावर गेलेले अभिजित पाटील हे अचानक भाजपकडे गेले.

  • Written By: Last Updated:

Madha Assembly Constituency: विधानसभा निवडणुकीत ( Assembly Election) तिकीट वाटपात अनेक धक्कातंत्र दिसून येत आहे. तर आता शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात वेगळीच खेळी केली आहे. लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणारे भाजपवासी झालेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Partil) हे आता तुतारीवर माढ्यातून (Madha) उमेदवारी करणार आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे.

संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीला झटका; उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार

या मतदारसंघातून विद्यमान आमदार बबन शिंदे हे स्वतःच्या मुलासाठी शरद पवार यांच्याकडे तिकीट मागत होती. त्यासाठी त्यांना अजित पवार यांची साथ सोडली होती. तर भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेही इच्छुक होते. रणजितसिंह मोहिते यांना तिकीट मिळेल, असे बोलले जात होती. पण शरद पवार यांनी मोहिते, शिंदे या दोघांना टाळले असून, अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिला आहे. अभिजित पाटील हे पंढरपूर आणि माढा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शरद पवार यांच्या व्यासपीठावर गेलेले अभिजित पाटील हे अचानक भाजपकडे गेले. त्यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्यामुळे ते भाजपबरोबर गेले होती. त्यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार केला होता. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला आहे. परंतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला जाईल हे निश्चित झालेला नाही.

‘मी मनाचा मोठेपणा दाखवला अन् चूक कबूल केली पण…’, भर सभेत अजितदादा भावूक

बबन शिंदेंची झाली कोंडी
माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे गेले होते. वयाचे कारणामुळे ते मुलगा रणजित शिंदे यांच्यासाठी तिकीट मागत होते. तिकीट न मिळाल्याबाबत ते म्हणाले, माझे वय 75 वर्षांपेक्षा जास्त झालेले आहे. त्यामुळे रणजित यांना रिंगणात अपक्षत उतरविणार आहे. गेल्या निवडणुकी मी 70 हजार मतांनी निवडून आलो होतो. यावेळी मुलाला मी जास्त मताधिक्याने जिंकून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. शरद पवार यांची काहीतरी अडचण असेल म्हणून त्यांनी तिकीट दिलेले नाही. पण त्यांचे माझ्यावर प्रेम आहे.

follow us