Shivsena Candidate List 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पंधरा जणांची उमेदवारी यादी आहेत. त्यात बारा जागांवर सेनेचे उमेदवार आहेत. तर दोन जागा मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर अशा तीन जागा एकनाथ शिंदे यांना मिळाल्या आहेत. संगमनेरमधून अमोल खताळ, नेवासा मतदारसंघातून विठ्ठलराव लंघे पाटील, श्रीरामपूर मतदारसंघातून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे रिंगणात उतरले आहे. विठ्ठलराव लंघे हे भाजपमध्ये आहे. त्यांना शिंदेंची उमेदवारी मिळाली आहे. संगमनेरमधून लढण्यासाठी सुजय विखे हे भाजपकडे तिकीट मागत होते. परंतु ही जागा शिंदे सेनेला गेली आहे. त्यामुळे येथून रिंगणात उतरण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.
‘उद्धव ठाकरे देव माणूस, घातकी माणसांसोबत गेलो अन्…’; तिकीट कापताच श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले
शायना एससी, संजना जाधव यांनाही उमेदवारी
भाजप नेते रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांना कन्नडमधून शिंदेंनी उमेदवारी जाहीर केली. तर भाजपच्या शायना एससी यांना मुंबादेवीतून तिकीट देण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात हिकमत उढाण यांना उमेदवारी देण्यात आली. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनाही तिकीट देण्यात आले आहे.
शिवसेनेचे उमेदवारी यादी-
सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर
घनसावंगी- हिकमत उढाण
कन्नड- संजना जाधव
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर -भाऊसाहेब कांबळे
नेवासा- विठ्ठल लंघे पाटील
धाराशिव-अजित पिंगळे
करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राऊत
गुहागर- राजेश बेंडल
पाठिंबा- जनसुराज्य
हातकणंगले- अशोकराव माने
राजश्री शाहू विकास आघाडी-
शिरोळ- राजेंद्र यड्रावकर
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.#शिवसेना #Maharashtra… pic.twitter.com/jEXJKRIzR1
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 28, 2024