‘उद्धव ठाकरे देव माणूस, घातकी माणसांसोबत गेलो अन्…’; तिकीट कापताच श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले

  • Written By: Published:
‘उद्धव ठाकरे देव माणूस, घातकी माणसांसोबत गेलो अन्…’; तिकीट कापताच श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले

Shriniwas vanaga : पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivasa Vanaga) यांना मोठा धक्का बसला. उमेदवारी नाकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देवाचे माणूस होते. पण मी घातकी माणसांसोबत गेलो अन् माझा घात झाला, असं म्हणत ते धायमोकळून रडले.

शरद पवारांचं माढ्यात वेगळंच राजकारण; साखर कारखानदार अभिजित पाटील यांना उमेदवारी 

उद्धव ठाकरेंची साथ सोडत सुरतला पळून जाणाऱ्यांमध्ये पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे देखील होते. मात्र, बंडात सहभागी होऊनही त्यांना उमेदवारी न मिळाल्याने वनगा यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. श्रीनिवास वनगा यांच्या जागी भाजपमधून शिंदे गटात आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना वनगा म्हणाले की, त्यावेळेस बंड करतांना मला शब्द दिला होता की, कोणत्याही आमदाराचे तिकीट कापलं जाणार नाही आणि आमची आज ही अवस्था आहे. मी प्रामाणिक, एकनिष्ठ राहिलो त्याचं फळ मिळालं. प्रामाणिकपणाचं हे फळ भेटलं. माझी फसवणूक झाली, अशी खंत वनगा यांनी व्यक्त केली. यावेळी ते धायमोकळून रडत होते.

मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं.., मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, उद्धवजींसारख्या देव माणसामुळं मी आमदार झालो. पण मी घातकी माणसांमुळं गेलो आणि माझा घात झाला. त्यांनी माझे तिकीट प्लॅनिंग करून माझं तिकीट कापलं. त्यांना प्रामाणिक व्यक्ती नको आहेत. त्यांना फक्त चोरी लबाडी करणारी लोकं हवी आहेत, अशा शब्दात वनगा यांनी शिंदेंवर टीका केली.

मी चुकलो आहे आणि त्यासाठी मला उद्धव ठाकरे या देव माणसाची माफी मागायची आहे, असंही वनगा म्हणाले.

दरम्यान, पालघरमध्ये श्रीनिवास वनगा यांनाच तिकीट मिळण्याची आशा होती. मात्र, शिंदे गटाने वनगा यांचा पत्ता करत गावित यांना संधी दिली. त्यामुळं आता श्रीनिवास वनगा काय निर्णय घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube