एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फक्त फरारच नाही, तर बेपत्ता करेन – वनमंत्री गणेश नाईक

एकनाथ शिंदे यांच्या आधी मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे त्यांनी मला हलक्यात घेऊ नये - वनमंत्री गणेश नाईक

  • Written By: Published:
Untitled Design (231)

Ganesh Naik took an aggressive stand against DCM Eknath Shinde : वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत टीका केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नाईक यांनी शिंदे यांचे नाव घेऊन आक्रमक भूमिका मांडली. ‘एकनाथ शिंदे यांच्या आधी मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे त्यांनी मला हलक्यात घेऊ नये. भाजपने जर परवानगी दिली, तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फक्त फरारच नाही, तर बेपत्ता करेन,’ असा इशारा गणेश नाईक यांनी दिला.

एकनाथ शिंदे नेहमीच ‘मला हलक्यात घेऊ नका, नाहीतर टांगा पलटी घोडे फरार’ असे म्हणतात. मात्र तेच मला हलक्यात घेत आहेत, असा आरोपही नाईक यांनी केला. कल्याण ग्रामीणमधील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम आपणच मांडला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘ज्या अटी आणि शर्तींवर हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यानुसारच ही गावे महापालिकेत समाविष्ट करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. 14 गावांचा प्रस्ताव मंजूर करताना मला विचारात न घेता हलक्यात वागणूक देण्यात आली,’ असा आरोप नाईक यांनी केला.

कुंभाच्या निमित्ताने हिंदुत्ववादी भाजपचा भ्रष्टाचार माजला; नाशिकच्या सभेतून राऊतांचा घणाघात

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारावरही गणेश नाईक यांनी गंभीर आरोप केले. महापालिकेच्या महासभेची मुदत संपली, तेव्हा सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मात्र प्रशासक राजवटीत दोन हजार 200 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या, असा दावा त्यांनी केला. ‘सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करून शिंदे गटातील माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये निधीची उधळपट्टी करण्यात आली. एका-एका प्रभागात शंभर-शंभर कोटींची कामे मंजूर करण्यात आली. या सर्व कामांची चौकशी निवडणुका झाल्यानंतर सुरू केली जाईल,’ असा इशाराही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला.

follow us