Tuljapur Assembly Constitueny : ‘मतदारसंघांचा कायापालट करायचा’; राणा जगजितसिंह पाटलांचा अर्ज दाखल…

आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेत महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Rana Jagjitsingh Patil

Rana Jagjitsingh Patil

Ranajagjitsinha Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी तुळजापूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. यावेळी महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा आशिर्वाद घेत पाटील यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राणा म्हणाले, “आई तुळजाभवानी व गोरोबा काकांच्या आशीर्वादाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त होत आहे. गेल्या अनेक वर्षात प्रामाणिक राहून जनतेची सेवा केली व विविध विकासकामांच्या माध्यमातून परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेतली.

आपल्या जिल्ह्याचा आणि तुळजापूर तालुक्याचा विकास हा बुलेट ट्रेन प्रमाणे होत आहे. ठाकरे सरकारच्या काळात विकास थांबला, पण आता आपला विकास खुंटणार नाही आणि खुंटू द्यायचा नाही. भूलथापांना आपण बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. यंदाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मतदारसंघाचा कायापालट आपल्याला करायचा आहे, असे आवाहन यावेळी सर्व उपस्थित नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केला”, असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय.

माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्याविरोधात मुलानेच खटला भरला; पक्षातील बंडखोरीवर पवार थेटच बोलले

राणा जगजितसिंह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार मारुतीराव मुळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, संताजी चालुक्य, मिलिंद पाटील यांच्यासह मतदारसंघातील महायुतीचे सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी दावा केला होता. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज कदम पाटीलसुद्धा इच्छूक होते. अखेर महाविकास आघाडीत या मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटल्यानतर धीरज कदम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

शरद पवारांचं माढ्यात वेगळंच राजकारण; साखर कारखानदार अभिजित पाटील यांना उमेदवारी

दरम्यान, राणा जगजितसिंह हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नेते धीरज कदम पाटील मैदानात आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह आणि कदम पाटील यांच्या थेट लढत होत असल्याने कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

Exit mobile version