Download App

बाकी सगळ्यांना क्लिन बोल्ड, डिपॉझिट गुल करायचंय ; मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंसह मविआवर बरसले !

म्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यातले नाही, आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक आहोत, अशा शब्दात सीएम शिंदेंनी विरोधकांवर टीका केली.

  • Written By: Last Updated:

CM Eknath Shinde Speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आज शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराची पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंगेश कुडाळकर हे शंभर टक्के निवडून येतील असा दावा केला. तसेच येत्या 23 नोव्हेंबरला अ‍ॅटम बॉम्ब फुटणार, असं भाकीतही एकनाथ शिंदेंनी केलं. यावेळी बोलतांना त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली. आधीच सरकार वसुली सरकार होतं, आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यातले नाही, आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक आहोत, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Vidhansabha Election : वरळी-वांद्र्यात मदत मिळावी म्हणून भिवंडीवर अन्याय, बंडखोर उमेदवाराचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

२३ तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार…
एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईतील ही पहिलीच प्रचार सभा आहे. हा मान कुर्ला विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. मंगेश कुडाळकर हे ओपनिंग्स बॅट्समन आहेत. आता तुम्हाला या मॅचमध्ये चौकार आणि षटकार मारायचा आहे. मारणार ना ? बाकी सगळ्यांना क्लिन बोल्ड, डिपॉझिट गुल करायचं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पुढं ते म्हणाले, इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. एवढे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त होईल. मंगेश कुडाळकर गेल्या वेळी 24 हजार मतांनी निवडून आले होते. आता तुम्हाला त्यांना 50 हजार मतांनी विजयी करायचे आहे. मंगेश कुडाळकर यांचा विजय निश्चित आहे. मी त्यांचे आधीच अभिनंदन करतोय. आता काही लवंगी फटाके फुटत आहेत. दिवाळी आहे. पण, आपला २३ तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार, असा दावाही शिंदेंनी केला.

Vidhansabha Election : मनोज जरांगेंचं ठरलं, बीडमध्येही देणार उमेदवार, धनंजय मुडेंची पहिली प्रतिक्रिया… 

खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा
ते म्हणाले, आम्ही देणारे लोक आहोत. मात्र, विरोधी पक्षाचे लोक लाकडी बहीण योजना बंद होईल, काय भीक देतात का, महिलांना विकत घेता का? असे म्हणायचे. असं म्हणणाऱ्या विरोधकांना काय उत्तर देणार? या योजनेच्या विरोधात ते न्यायालयातही गेले. लाडकी बहीण योजना बंद व्हावी, म्हणून ते प्रयत्न करत आहेत. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली, खोडा घालणाऱ्याना जोडा दाखवा, असं आवाहन त्यांनी केलं.

दर महिन्याचा माहेरचा आहेर मिळणार
लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नयेत, यासाठी नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये देण्यात आले. डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येतील. कारण आपला हेतू चांगला आहे. कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आता तुम्हाला फक्त वर्षाला भाऊबीज मिळणार नाही, तर दर महिन्याला भाऊबीज मिळेल. आपल्याला दर महिन्याचा माहेरचा आहेर मिळणार, लाडक्या बहिणींना लखती होतांना पहायचं आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, आता विरोधक बोलतात, आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार… आमच्यावर चौकशी लावण्याची, जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. तुमच्या लाडक्या भावाला जेलमध्ये टाकलेलं चालेल का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी जनतेला केला.

आधीच सरकार वसुली सरकार
यावेळी बोलता्ंना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आधीच सरकार वसुली सरकार होतं, त्यांनी अडीच वर्षात फक्त वसुली मारली. मात्र, आपल्या अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारं सरकार आहे. आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यातले नाही, आम्ही फेस टू फेस काम करणाऱे लोक आहोत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

follow us