Download App

महायुती एकच, आम्ही ‘त्यांना’ अर्ज मागे घ्यायला लावू…; बंडखोरांचा फडणवीसांकडून बंदोबस्त

ज्या ज्या पक्षातील नाराज असलेल्यांनी अर्ज भरले, त्या संबंधित पक्षाचे नेते त्यांना अर्ज मागे घ्यायला लावतील.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला (Vidhansabha Election) अवघे काही दिवस उरले आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा होत आहेत. मात्र, महायुतीमध्ये अनेक जागांवरील उमेदवारीवरून स्थानिक नेत्यामध्ये मतभेद असल्याचं समोर येत आहे. अनेक मतदारसंघात इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरल्यानं नाराज नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.

अनिल देशमुखांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात; पवारांकडून चौथी उमेदवारी यादी जाहीर 

श्वेता महाले यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस चिखली येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. श्वेता महाले यांनी पाच वर्षात सभागृहात आणि सभागृहाबाहेर अतिशय उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. मतदारसंघाचा खूप चांगला विकास त्यांनी केला. रस्ते, शेतरस्ते, गाव रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. उत्कृष्ठ आमदार म्हणून त्यांचा गौरवही सभागृहाने केला. त्यामुळं श्वेताताई मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

निलंगा येथे उद्या महायुतीची आशीर्वाद सभा; हजारोंच्या साक्षीने आ.निलंगेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज 

महायुतीमध्ये अनेक जागांवरून बंडखोरीची शक्यता आहे, ही बंडखोरी कशी रोखणार? असा सवाल केला असता फडणवीस म्हणाले, बंडखोरी रोखण्याकरिता आम्ही सगळे नेते एकत्रित बसून यावर निर्णय घेऊ. ज्या ज्या पक्षातील नाराज असलेल्यांनी अर्ज भरले, त्या संबंधित पक्षाचे नेते त्यांना अर्ज मागे घ्यायला लावतील. पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली, तिथं तोच उमेदवार लढत देईल. जिथं कमळ चिन्हावर एखाद्याला उमेदवारी दिली असेल तिथं तोच उमेदवार लढेल. जिथं धनुष्यबाणावर उमेदवारी दिली, तिथं धनुष्यबाणावरच उमेदवार लढेल. महायुती एकच आहे, असं फडणवीस म्हणाले.

मोर्शी मतदारसंघात भाजपकडून उमेश यावलकर आणि राष्ट्रवादी-अजित पवार पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाली. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असं ते म्हणाले.

follow us