Kishor Jorgewar : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला. आता लवकरच उमेदवारांची घोषणा केली होईल. त्यानिमित्ताने राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. शरद पवार (Sharad Pawar) गटात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक दिग्गज नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. आता चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
आचारसंहितेत निर्णय जाहीर, शिंदे सरकारला भोवणार? आयोगाकडून कारवाईचे संकेत
शरद पवार अनेक माजी-आमदारांना राष्ट्रवादीत आणत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडलेल्या चाळीस आमदारांची ते भरपाई करत आहेत. आता जोरगेवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानसभेच्या तिकिटासाठी प्रस्ताव पाठवला होता. जोरगेवार यांनी होकार दर्शवला आहे. त्यामुळे चंद्रपूरची जागा महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडे गेल्यास येथून किशोर जोरगेवार हे पक्षाचे उमेदवार असतील. लवकरच जोरगेवार यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
महादेव जानकरांचा महायुतीला ‘रामराम’! महायुती सोडतील असं वाटत नाही; तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
कालपर्यंत महायुतीला पाठिंबा देणारे जोरगेवार हे अनेक पक्षात फिरून आलेल्या त्याना यांना भाजपने तिकीट नाकारल्याची चर्चा आहे. जोरगेवार यांना तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून आम्ही केवळ सतरंज्या उचलायच्या का, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, भाजपने तिकीट देण्यास नकार दिल्याने जोरगेवार यांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यातच त्याना शरद पवार गटाकडून प्रस्ताव आला. जोरगेवार यांची ही भूमिका महायुती आणि विशेषत: भाजपसाठी मोठा धक्का मानली जात आहे. दरम्यान, चंद्रपूरची जागा महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता असून आता भाजप इथून कुणाला उमेदवारी देते हेच पाहणं महत्वाचं आहे.
अजितदादांचे नेते शरद पवार गटाच्या वाटेवर…
अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, दौंडचे रमेश थोरात, पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, सांगलीचे खानापूरचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.